सतत मोबाईलच्या नादात न राहता चिमुकलींन जपला छंद; दगडातून साकारल्या सुंदर कलाकृती 

सतत मोबाईलच्या नादात न राहता चिमुकलींन जपला छंद; दगडातून साकारल्या सुंदर कलाकृती 
Updated on

सावनेर (जि. नागपूर) : दिवसभर घरीच राहून मुले कंटाळुन गेल्याने कुणी टीव्हीवर कार्टून (cartoon) बघण्यात तर कुणी मोबाईलच्या (Mobile) नादात वेळ घालवताना दिसत आहे मात्र सावनेर येथील श्रुती किरण खापर्डे या सातव्या वर्गात असलेल्या तेरा वर्षाच्या चिमुकलीने सतत मोबाईलच्या नादात न राहता आपल्या कल्पनाशक्तीचा छंद (Hobbies) जोपासत विविध रंगातून चित्र रेखाटत दगडातूनही सुंदर कलाकृती (Stone Art) साकारली आहे. (Girl from Saoner Nagpur create stone art)

सतत मोबाईलच्या नादात न राहता चिमुकलींन जपला छंद; दगडातून साकारल्या सुंदर कलाकृती 
'महाराष्ट्रात मराठा समाजावर अशी वेळ यावी हीच शोकांतिका; नागपुरातील मराठा समाज संयोजकांचं परखड मत

यासाठी लागणारे साहित्य आणून देण्यास आई-बाबा टाळाटाळ करत नाही माझ्या कलेचे ते कौतुक करतात यामुळे माझे मनोबल वाढले असे श्रुती सांगते तिने गणेश उत्सवाला एखाद्या मूर्तिकारा प्रमाणेच हुबेहूब मातीपासून गणेशाची मूर्ती तयार केली होती असे श्रुतीचे आई वडिल सांगतात याशिवाय तिला गायन व नृत्य कलेची आवड असल्याचेही सांगितल्या जात आहे.असेच मोबाईल पासून दूर राहून आपल्या कल्पनाशक्तीच्या जोरावर छंद जोपासत शहरातील 16 वर्षीय अंजली कोहळे ही आईच्या सहकार्याने कलाकृती रेखाटत आहे.     

कोरोनाच्या स्थितीमुळे मुलांवर घरीच राहण्याची वेळ आल्याने अनेक मुलांनी आपल्या कल्पनाशक्तीच्या जोरावर आपल्यातील कलागुणांना दाखवून दिले आहे कोरोनामुळे सर्वांचे नियोजन कोलमडल्याने बच्चेकंपनीच्याही आनंदावर विरजण पडले आहे.ना शाळा ना मोकळेपणाने खेळण्याची मुभा मामाचे गावही दुरावले त्यामुळे घरीच राहून चिमुकल्यांचेही चेहरे हिरमुसले आहेत.ज्यांच्याकडे मोबाईल आहेत अशी अनेक चिमुकली मुले सतत मोबाईलच्या नादात राहुन वेळ काढत आहेत.बऱ्याच ठिकाणी पालकही त्यांचे लाड पुरवीत आहेत मात्र ज्या पालकांनी मोबाईलचे दुष्परिणाम ओळखलेत असे पालक मुलांना मोबाईलचे व्यसन लागू नये यासाठी वेगवेगळ्या कलाकृतीकडे वळवीतांना दिसत आहे.

सतत मोबाईलच्या नादात न राहता चिमुकलींन जपला छंद; दगडातून साकारल्या सुंदर कलाकृती 
अल्फियाच्या शिरपेचात आणखी एक 'ताज'; सर्वोत्कृष्ट बॉक्सर म्हणून निवड

कुठे मुलेच स्वतःहून मोबाईलच्या नादात न राहता आपला छंद जोपासत आहेत बऱ्याच ठिकाणी चिमुकल्यांनी आपल्या कल्पनाशक्तीने पालकांचे सहकार्य घेऊन वेगवेगळा छंद जोपासत आनंदाचा मार्ग शोधला आहे. ग्रामीण भागातील बरेच शेतकरी आपली मुले बाहेर भटकू नये यासाठी शेतात जातांना सोबत घेऊन जात असल्याने ही मुले झाडाच्या सावलीत शेत पिकांसोबत खेळू बागडू लागली आहेत.तर तर कुठे आजी आजोबा मुलांना दंतकथा सांगून त्यांचे मनोरंजन करीत आहेत शहरी भागातील चिमुकले वाचन, चित्र रेखाटणे, कॅरम खेळणे ,टीव्हीवरील कार्टून बघणे, मोबाईलवर गेम खेळणे आदि मध्ये व्यस्त राहून आपला वेळ काढत आहेत.

(Girl from Saoner Nagpur create stone art)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.