Gond Govari Protest: आदिवासी गोंड गोवारी बांधवांचे उपोषण मागे, १९८५ चा जीआर दुरुस्त न केल्यास पुन्हा उपोषणास्त्र

किशोर चौधरी यांनी राज्य शासनाने आश्वासन पाळले नाही, अन् दगाफटका केल्यास पुन्हा उपोषण करण्याचा इशारा दिला.
Gond Govari Protest: आदिवासी गोंड गोवारी बांधवांचे उपोषण मागे, १९८५ चा जीआर दुरुस्त न केल्यास पुन्हा उपोषणास्त्र
Updated on

Nagpur Gond Govari Hunger Strike: आदिवासी गोंड गोवारीबाबत १९८५ साली खोटा अध्यादेश सरकारने काढला, त्यात दुरुस्तीची साधी मागणी आहे. मात्र आमच्या चार पिढ्या बरबाद झाल्यानंतरही दुरुस्ती केली नाही, असे खडेबोल सुनावत उपोषणकर्ते किशोर चौधरी, सचिन चचाने आणि चंदन कोहरे यांनी सेवानिवृत्त न्यायमूर्तींच्या समितीने सहा महिन्यांत निर्णय घ्यावा, असे सांगत आदिवासी गोंड गोवारी समाजाचे उपोषण मागे घेण्याचे जाहीर केले.

उपस्थितांनी यावेळी ‘जय सेवा’च्या घोषणांचा गजर केला. तेव्हा माईक हाती घेत किशोर चौधरी यांनी राज्य शासनाने आश्वासन पाळले नाही, अन् दगाफटका केल्यास पुन्हा उपोषण करण्याचा इशारा दिला.

लाखावर आदिवासी गोंड गोवारी बांधवांनी हक्कासाठी ५ फेब्रुवारीला सरकारविरोधात उपराजधानीत एल्गार पुकारला होता. यामुळे शासन हादरले. १० फेब्रुवारीला मुंबईत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, माजी मंत्री परिणय फुके यांच्यासह समाजाच्या शिष्टमंडळासोबत बैठक झाली. (Latest Marathi News)

यावेळी १९८५ सालच्या अध्यादेशात दुरुस्तीसाठी समिती गठित करण्याचे आश्वासन देण्यात आले. मात्र बैठकीचा अहवाल न आल्यामुळे आंदोलन सुरू होते. सोमवारचे ठिय्या आंदोलन होऊ नये यासाठी रविवार (ता.११) सुटीचा दिवस असतानाही आदिवासी गोंड गोवारी समाजाच्या संविधान चौकातील उपोषण मंडपाला जिल्हाधिकारी डॉ. विपिन इटनकर, परिणय फुके यांनी भेट देत बैठकीचा अहवाल देत उपोषणकर्त्यांना उपोषण मागे घेण्याची विनंती केली.

Gond Govari Protest: आदिवासी गोंड गोवारी बांधवांचे उपोषण मागे, १९८५ चा जीआर दुरुस्त न केल्यास पुन्हा उपोषणास्त्र
Deadpool 3 Teaser : डेडपूल अन् वुलव्हरीन मिळून बदलणार मार्व्हलचं जग; 'एक्स-मेन' अन् 'अव्हेंजर्स' येणार एकत्र! पाहा भन्नाट टीझर

२६ जानेवारीपासून सुरू झालेले उपोषण संविधान चौकातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला पुष्पहार घालून संविधानाची प्रस्तावना वाचून १७ व्या दिवशी मागे घेण्यात आले. यानंतर शहीद गोवारी स्मारकाला उपोषणकर्त्यांसह समाजबांधवांनी अभिवादन केले.

सोमवारच्या ठिय्या आंदोलनाचा घेतला धसका

सोमवारी (ता.१२) गोंडगोवारी समाजाच्या उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी राज्यभरातून गोंडगोवारी बांधव वाहनांनी निघाले होते. शहराच्या सीमेवर येऊन आंदोलक थांबले होते, अशी चर्चा उपोषण मंडप परिसरात होती.

ही माहिती शासनाला मिळाली. रविवार सुटीचा दिवस असतानाही जिल्हाधिकाऱ्यांच्या पुढाकारातून अध्यादेशात दुरुस्ती करण्यासाठी सेवानिवृत्त न्यायमूर्तींच्या नेतृत्वात समिती स्थापन करण्यात आल्याचा अहवाल उपोषणकर्त्यांच्या हाती दिला गेला. (Latest Marathi News)

यावेळी आदिवासी गोवारी जमात संविधानिक हक्क संघर्ष कृती समितीचे रामदास नेवारे, कैलास राऊत, रुपेश चामलोट, पूर्णा नेवारे, हेमराज नेवारे, अरुणा चचाणे, कविता नेवारे, सुदर्शन चामलोट, गजानन कोहळे, शेषराव नेवारे यांच्यासह मोठ्या संख्येत समाजाचे कार्यकर्ते उपस्थित होते.

Gond Govari Protest: आदिवासी गोंड गोवारी बांधवांचे उपोषण मागे, १९८५ चा जीआर दुरुस्त न केल्यास पुन्हा उपोषणास्त्र
Bihar Floor Test: बिहारमध्ये विश्वासदर्शक ठरावापूर्वीच मोठा ट्विस्ट; १० आमदार नॉटरिचेबल, पोलिसांत तक्रार; जाणून घ्या १० महत्वाच्या घडामोडी

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.