Vedgaon Crime: कुऱ्हाडीने वार करून पत्नीची हत्या! वेडगाव येथील घटना; कारण गुलदस्त्यात, पती फरार

गाढ झोपेत असलेल्या पत्नीची क्रुरपणे पतीने हत्या केली. ही खळबळजनक घटना जिल्ह्यातील गोंडपिपरी तालुक्यात येणाऱ्या वेडगाव येथे गुरुवार (ता. १५) मध्यरात्री घडली.
Vedgaon Crime: कुऱ्हाडीने वार करून पत्नीची हत्या! वेडगाव येथील घटना; कारण गुलदस्त्यात, पती फरार
Updated on

Nagpur Husband Stabbed Wife : गाढ झोपेत असलेल्या पत्नीची क्रुरपणे पतीने हत्या केली. ही खळबळजनक घटना जिल्ह्यातील गोंडपिपरी तालुक्यात येणाऱ्या वेडगाव येथे गुरुवार (ता. १५) मध्यरात्री घडली. मुले कापूस भरायला गेली असताना पतीने कुऱ्हाडीने गळ्यावर वार करून पत्नीची हत्या केली. लता दामोदर धुडसे ( वय ४० वर्ष) असे मृत महिलेचे नाव आहे.

घटना उघडकीस येताच गाव हादरले. पोलिसांनी घटनास्थळ गाठायच्या आधीच पती दामोधर मारोती धुडसे फरार झाला. पोलिस आरोपीचा शोध घेत आहेत. दरम्यान, हत्येचे नेमके कारण अद्याप पुढे आले नाही.

गोंडपिपरी तालुक्याच्या शेवटचा टोकावर वेडगाव हे लहानसे गाव. या गावात गुरुवारच्या मध्यरात्री हत्येचा थरार घडला. गावातील दामोधर मारोती धुडसे याची दोन मुले कापसाची गाडी भरायला गेले होते. पत्नी लता धुडसे या गाढ झोपेत होत्या. मध्यरात्रीचा सुमारास पती दामोधर याने हातात कुऱ्हाड उचलली. त्याने लता हिच्या मानेवर सपासप वार केले. यात तिचा घटनास्थळीच मृत्यू झाला. (Latest Marathi News)

घरात रक्ताचा सडा सांडला होता. घटनेची माहिती मिळताच गावकऱ्यांनी दामोधर यांच्या घराकडे धाव घेतली. काहींनी पोलिसांना घटनेची माहिती दिली. गावकऱ्यांना बघताच दामोधर हा घटनास्थळावरून फरार झाला. जिल्ह्याचे पोलिस अधीक्षक मुमक्का सुदर्शन, अपर पोलिस अधीक्षक रीना जनबंधु यांनी घटनास्थळ गाठले. त्यांच्या मार्गदर्शनात लाठीचे ठाणेदार युवराज शहारे यांनी मोका पंचनामा केला. आरोपीवर हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. फरार असलेल्या पतीचा शोध पोलिस घेत आहे.

Vedgaon Crime: कुऱ्हाडीने वार करून पत्नीची हत्या! वेडगाव येथील घटना; कारण गुलदस्त्यात, पती फरार
Adhalrao Patil: म्हाडाचं अध्यक्षपद देऊन बोळवण केल्यानंतर आढळराव पाटलांनी स्पष्टच सांगितलं; म्हणाले, अद्याप...

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.