Cyber Crime : ऑनलाइन विमानाचे तिकीट काढणे भोवले; गुगलवर नंबर सर्च केल्यावर खात्यातून रक्कम गायब

ऑनलाइन विमानाचे तिकीट काढणे भोवले; सायबर पोलिसांनी लावला छडा
google Online flight ticket booking fraud of lakh crime cyber police trap nagpur
google Online flight ticket booking fraud of lakh crime cyber police trap nagpurSakal
Updated on

नागपूर : विमानाचे तिकीट बुक करण्यासाठी गुगलवर ऑनलाइन सर्च करणे एकाला चांगलेच महागात पडले. गुगलमध्ये दिलेल्या नंबरवर कॉल केल्यानंतर सायबर ठगबाजाने चक्क तक्रारदाराची १ लाख ४७ हजार ७८५ रुपयांनी फसवणूक केली.

तक्रारदाराला नागपूर ते दिल्ली आणि दिल्ली ते नागपूर असे ऑनलाइन विमानाचे तिकीट काढायचे होते. त्यांनी गुगलवर सर्च केला. त्यानंतर ऑनलाइन एक पेज ओपन झाले. त्यापेजवर त्यांनी आपली माहिती भरली. काही वेळानंतर त्यांच्या खात्यातून १ लाख ४७ हजार ७८५ रुपयांची रक्कम डेबिट झाल्याचा त्यांना मेसेज आला. मेसेज पाहून त्यांना धक्काच बसला. ही घटना बुधवार १७ मे रोजी घडली.

google Online flight ticket booking fraud of lakh crime cyber police trap nagpur
Nashik Cyber Crime : सावधान! अनोळखी व्हिडिओ कॉल टाळा; अन्यथा...

सायबर पोलिसांचे पथक कळमेश्वरमध्ये ऑनलाइन फसवणुकी संदर्भात जनजागृती करीत होते. दरम्यान फिर्यादी यांनी घडलेला सर्व प्रकार सायबर पोलिसांना सांगितला. पोलिसांनी सर्व बाजूंनी तांत्रिक पद्धतीने तपास केला. ज्या खात्यात पैसे वळते झाले. ते खाते हुडकून काढत फिर्यादीची गेलेली सर्व रक्कम परत खात्यात वळती करून दिली. परत आलेली रक्कम पाहून फिर्यादचे समाधान झाले. त्याने पोलिसांचे आभार मानले.

google Online flight ticket booking fraud of lakh crime cyber police trap nagpur
Cyber Crime : लोकांना कोट्यावधी रुपयांचा गंडा घालणारा ऑनलाईन 'Gold Trading' स्कॅम माहितेय?

ही कारवाई पोलिस अधिक्षक विशाल आनंद व अपर पोलिस अधिक्षक डॉ. संदीप पखाले यांच्या मार्गदर्शनात पोलिस उपनिरीक्षक निशांत जुनोनकर, पोलिस उपनिरीक्षक भारत थिटे, महिला पोलिस हवालदार स्नेहलता ढवळे, वर्षा खंडाईत, संगीता गावंडे, सतीश राठोड मृणाल राऊत, वैष्णवी पवार आदींनी केली.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()