Bacchu Kadu: बच्चू कडूंना मोठा दिलासा! हत्येच्या प्रयत्नाचा गुन्हा रद्द; कोर्टानं दिले 'हे' महत्वाचे निर्देश

गोपाल तिरमारे हल्ला प्रकरणी अमरावतीच्या चंदूरबाजार पोलीस ठाण्यात ५ जणांवर गुन्हा दाखल होता.
Bacchu Kadu News
Bacchu Kadu Newsesakal
Updated on

नागपूर : अमरावती जिल्ह्यातील अचलपूरचे आमदार बच्चू कडू यांच्याविरोधातील हत्येच्या प्रयत्नाचा गुन्हा मुंबई हायकोर्टाच्या नागपूर खंडपीठानं रद्द केला आहे. त्यामुळं बच्चू कडू यांना लोकसभा निवडणुकीच्या तोंडावरच मोठा दिलासा मिळाला आहे. कोर्टाच्या निकालानंतर चांदूर बाजार पोलिसांनी हा गुन्हा रद्द केला आहे. (gopal tirmare attempt to murder case bacchu kadu big relief high court bench canceled case of attempted murder aau85)

Bacchu Kadu News
निवडणुकीत खर्च जरा सांभाळून! उमेदवारांना दररोज द्यावा लागणार हिशेब; २५ दिवसांत ९५ लाखांच्या खर्चाचे बंधन; प्रत्येक सभा, कार्यक्रमांचे व्हिडिओ शूटिंग

या प्रकरणावर न्यायमूर्ती विनय जोशी आणि न्यायमूर्ती वृषाली जोशी यांच्यासमक्ष सुनावणी झाली. ही घटना ९ फेब्रुवारी २०१८ रोजी चांदूर बाजार परिसरात घडली होती. या प्रकरणात भाजपचे चांदूर बाजार नगरपरिषदेचे तत्कालीन नगरसेवक गोपाल तिरमारे यांनी ही तक्रार दाखल केली होती. कडू व अन्य चार जणांनी त्यांच्यावर प्राणघातक हल्ला केला होता, असा आरोप तिरमारे यांनी केला होता. (Marathi Tajya Batmya)

Bacchu Kadu News
Wanindu Hasaranga : निवृत्तीतून यू-टर्न घेणाऱ्या खेळाडूवर ICC ने घेतली मोठी ॲक्शन! 'या' चुकीमुळे सस्पेंड, आता IPL खेळणार?

याप्रकरणी पोलिसांनी भादंविच्या ३०७ अन्वये गुन्हे दाखल केले. कडू यांनी हा गुन्हा रद्द करण्याच्या विनंतीसह २०१८ मध्ये उच्च न्यायालयात अर्ज दाखल केला. हे आरोप खोटे असून तिरमारे केवळ कडू यांच्याविरुद्ध खोटे आरोप करण्याची संधीच शोधत असतात. तिरमारे यांच्याविरुद्ध विविध प्रकरणांत गुन्हे दाखल करण्यात आलेत. राजकीय सुडातून त्यांनी हे खोटे आरोप केलेत, असा युक्तिवाद कडू यांच्यातर्फे करण्यात आला. (Latest Marathi News)

Bacchu Kadu News
VIDEO: आईसक्रीम विक्रेत्याचं अत्यंत किळसवाणं कृत्य, फालुदामध्ये चक्क..; लोकांच्या संतापानंतर पोलिसांची कारवाई

दरम्यान, पोलिसांनी स्वत:च हे प्रकरण मागे घ्यावे, अन्यथा न्यायालय तसा आदेश देईल, असे मौखिक निरीक्षण न्यायालयाने नोंदविले होते. पोलिसांनी उत्तर दाखल केल्यानंतर उच्च न्यायालयाने हा गुन्हा रद्द करण्याचे आदेश दिले. बच्चू कडू यांच्यातर्फे ॲड. फिरदोस मिर्झा यांनी बाजू मांडली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.