GST Department : दुकानाचा पत्ता चुकला तर भरा ५० हजार दंड

बोगस जीएसटी नोंदणी शोधणे आणि बोगस इनपुट टॅक्स क्रेडिटचा दावा करून अवाजवी फायदा देणाऱ्यांविरुद्ध सेंट्रल बोर्ड ऑफ अप्रत्यक्ष कर आणि सीमाशुल्क विभागाने एल्गार उभारला आहे.
Fine
FineSakal
Updated on
Summary

बोगस जीएसटी नोंदणी शोधणे आणि बोगस इनपुट टॅक्स क्रेडिटचा दावा करून अवाजवी फायदा देणाऱ्यांविरुद्ध सेंट्रल बोर्ड ऑफ अप्रत्यक्ष कर आणि सीमाशुल्क विभागाने एल्गार उभारला आहे.

नागपूर - बोगस जीएसटी नोंदणी शोधणे आणि बोगस इनपुट टॅक्स क्रेडिटचा दावा करून अवाजवी फायदा देणाऱ्यांविरुद्ध सेंट्रल बोर्ड ऑफ अप्रत्यक्ष कर आणि सीमाशुल्क विभागाने एल्गार उभारला आहे. मंगळवारपासून (ता.१६) ते १६ जुलै दरम्यान विशेष मोहीम राबवणार आहेत. यात दुकानाचा पत्ता चुकीचा आढळल्यास ५० हजारांचा दंड होण्याची शक्यता आहे.

या मोहिमेत संशयास्पद जीएसटी खाती ओळखण्याबरोबरच, जीएसटी नेटवर्क (जीएसटीएन) मधून बनावट बिले वगळण्यासाठी आवश्यक पावले उचलली जाणार आहे. या तपासणीत संबंधित करदात्याची माहिती काल्पनिक असल्याचे आढळल्यास, नोंदणी रद्द होऊ शकते. व्यापाऱ्याला ५० हजार रुपयांचा दंडही ठोठवला जाऊ शकतो.

जेव्हा-जेव्हा अशा मोहीम राबवण्यात आल्या, तेव्हा बाजारातील वातावरण तणावपूर्ण झाले आहे. व्हॅटच्या काळातही अशा मोहीम चालायच्या. मग बाजारात इन्स्पेक्टर राज आणि लाचखोरीला प्रोत्साहन दिल्याचे दिसून आले. प्रत्येक दुकानाला निरीक्षक भेट देत असतं, अनेकवेळा प्रामाणिक व्यापाऱ्यांनाही यात अडचणींचा सामना करावा लागला, स्वच्छ काम करूनही छोट्या-छोट्या चुकांसाठी त्रास सहन करावा लागला. अधिकारी बाजारात पोहोचून प्रत्येक दुकानाचे सर्वेक्षण करतात, तेव्हा घबराट पसरते असे व्यापाऱ्यांचे म्हणणे आहे.

व्यापाऱ्यांनो हे करा

  • जीएसटी क्रमांकासह बोर्डवर फर्मचे नाव आणि पत्ता दुकान, कार्यालय, कारखान्याबाहेर असावा

  • व्यवसायाच्या जागेवर जीएसटी प्रमाणपत्र प्रदर्शित केलेले असणे आवश्यक आहे

  • जीएसटी प्रमाणपत्रावर अशा जागेचा पत्ता नमूद करावा, अन्यथा ५० हजाराचा दंड होऊ शकतो

  • विक्री आणि खरेदीची बिले व्यवसायाच्या ठिकाणी तुमच्या ताब्यात असावीत

  • भाड्याने घेतली असेल तर वैध नोंदणीकृत भाडे करार असावा

  • नोंदणी प्रमाणपत्रावरील पत्ता तुम्ही आहात त्या जागेव्यतिरिक्त असेल, व्यवसाय चालवताना, जीएसटी अधिकारी तुमची फर्म बोगस म्हणून घोषित करेल

  • जीएसटी प्रॅक्टिशनर किंवा चार्टर्ड अकाउंटंटचा सल्ला घ्यावा

बनावट डीलर्स किंवा बोगस डीलर्स संपले पाहिजे. त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे. खऱ्या व्यापाऱ्यांना कोणतीही अडचण येणार नाही याची काळजी सरकारने घ्यावी. तपासणी व्यापाऱ्यांना त्रास होणार नाही याकडे लक्ष द्यावे. व्यापाऱ्यांच्या काही त्रुटी आढळल्यास त्या त्यांना समजावून सांगाव्यात आणि त्या दुरुस्त करण्याची संधीही द्यावी.

- दीपेन अग्रवाल, अध्यक्ष चेंबर ऑफ असोसिएशन ऑफ महाराष्ट्र इंडस्ट्री ॲण्ड ट्रेड

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.