ऊॅंट पकडवाने की झंझट मिटा देंगे

१५० उंटांचे मालक गुजरातचे भिकाभाई रब्बारी यांचे अमरावतीच्या जिल्हाधिकाऱ्यांना पत्र
camels
camelssakal
Updated on

नागपूर : ‘‘ऊॅंट को पकडवाने की झंझट हमेशा के लिए मिटा देंगे. जिले के कलेक्टर का लेटर साथ दिलवा देंगे,’’ कच्छ उॅंट उच्छेरक मालधारी संघटनेचे प्रमुख गुजरातमधील भिकाबाई वाघाभाई रब्बारी यांनी 'सकाळ'ला सांगितले.कत्तलीसाठी उंट नेत असल्याच्या तक्रारीवरून अमरावती जिल्ह्यातील धामणगाव रेल्वे तालुक्यात ५८ उंट ताब्यात घेतले गेले. ते उंट कत्तलीसाठी नव्हे तर महाराष्ट्र आणि छत्तीसगडमधील मेंढीपालक रब्बारी समुदायाच्या वापरासाठी नेण्यात येत होते, असे पत्र भिकाभाई यांनी अमरावतीच्या जिल्हाधिकाऱ्यांना नुकतेच पाठविले.

camels
रखडलेल्या कामांसाठी निधी मंजूर; जिल्हाधिकाऱ्यांचा मंगळवेढा दौरा यशस्वी

‘सकाळ’ प्रतिनिधीसोबत बोलताना त्यांनी उंटांच्या वापराविषयी विशेष माहिती दिली. ‘‘गुजरातहून सहा दशकांहून जास्त काळापासून रब्बारी समुदाय महाराष्ट्र, आंध्रप्रदेश, मध्यप्रदेश, छत्तीसगड आदी राज्यात स्थलांतरित झाला. या राज्यांमध्ये स्थलांतरित झालेल्या कुटुंबांची संख्या सुमारे अडीच हजारांच्या वर आहे. त्यातील बहुसंख्य रब्बारी लोक सामान एका ठिकाणाहून दुसरीकडे नेण्यासाठी उंटाचाच वापर करतात. डोंगराळ भागात होणाऱ्या अतिवृष्टीमुळे आणि पावसाळ्यातील आजारांमुळे दरवर्षी कित्येक उंटांचा मृत्यू होतो. त्यामुळे नवीन उंटांची गरज भासते. हे ५८ उंट तेथील रब्बारींनी खरेदी केले होते. त्यांच्याकडेच पोहोचविण्यासाठीच पाच मजूर निघाले होते’’, अशी माहिती भिकाभाईंनी दिली.

‘उंट खरेदी-विक्रीचे सरकारी मार्केट आणि अधिकृत पद्धत नाही का?’’, असे विचारले असता ‘नाही’ असे म्हणाले. ‘‘असले कोणतेच मार्केट आमच्या भागात नाही. त्यामुळे खरेदी-विक्रीचा सरकारी रेकाॅर्डवर येईल असला कोणताही व्यवहार होत नाही. गावांमध्ये अनेकांकडे उंट असतात. माझ्याकडे १५० हून जास्त मादी उंट आहेत. तसे अनेकांकडे आहेत. त्यांच्याकडून लोक विकत घेतात. त्यांचे व्यवहार थेट रब्बारी व्यक्ती आणि गावातील उंटमालक असेच असतात. त्यामुळे त्याची चिठ्ठी- पट्टी बनत नाही. त्यामुळेच हे अकस्मात संकट आले. परंतु त्याचा निस्तरा कायमस्वरूपी करण्याची गरज भासत आहे आणि आम्ही तो लवकरच करू’’, असे त्यांनी सांगितले.

camels
शेततळ्यात पडून आईसह चिमुकलींचा मृत्यू

काॅंटने वाले के पास नही जाते

भिकाभाई वाघाभाई रब्बारी गुजरातमधील भूज जिल्ह्यातील बछ्चाव तालुक्यातील जंगी या गावी राहतात. भूजपासून जंगी ७० किमी अंतरावर आहे. ‘कच्छ उॅंट उच्छेरक मालधारी संघटना’ ही उंटपालकांची राष्ट्रीय पातळीवरील संघटना आहे. यात मीनाबेन हरीभाई रब्बारी, सामा उमर हाजी, भाचीभाई गुलमामद जाट, नुरममद मेरू चाट, जीवाभाई कनाभाऊ रब्बारी, रबराखिया हाजीमेरान जाट, वालीबेन रूपाभाई रब्बारी आदी अनेक रब्बारी कार्यकर्ते आहेत. खैराई आणि कच्च्छी जातीच्या उंटांचा वापर करणाऱ्या रब्बारी, जाट आणि सामा या समुदायांसाठी त्यांची संघटना काम करते. एकटा रब्बारी समुदाय १८ मुख्य जाती आणि १३३ पोटजातींमध्ये विभागला आहे. त्यातील अनेक जाती आणि पोटजातींचे लोक विदर्भातील वेगवेगळ्या जिल्ह्यात स्थायिक झालेले आहेत. खैराई जातीचे उंट पुरातूनही पोहून जाऊ शकतात. त्यामुळे त्यांना रब्बारींची पसंती असते. पकडलेल्या उंटामॆध्ये दोन्ही प्रकारचे उंट असल्याची माहितीही भिकाभाईंनी दिली. ‘हमारे रब्बारी लोग उॅंट काॅंटने वालो के पास नही जाते’, हे त्यांनी आवर्जून सांगितले.

camels
‘सकाळ’ कणकवली कार्यालयाचा आज वर्धापन दिन

अघटित टाळण्यासाठी उपाययोजना लवकरच

‘‘उंट एका ठिकाणाहून दुसरीकडे नेताना काय पद्धत असली पाहिजे, यावर आमच्या संस्थेच्या माध्यमातून लवकरच काम करण्यात येईल. गुजरातमधील संबंधित जिल्ह्याचे जिल्हाधिकारी आणि पोलिस स्टेशन यांना कळविण्यात येऊन त्यांच्या फोन नंबरचे पत्र सोबत ठेवण्याची पद्धत अवलंबण्यात यावी किंवा आणखी काय, याबाबत लवरकच एक निश्चित पद्धती विकसित करण्यात येईल. उंट होते म्हणून बरे झाले. गायी असत्या तर कट्टरांनी काय केले असते हे सांगता येत नाही. भविष्यातील वाईट घटनांना टाळण्यासाठी उपाययोजना करण्यात येईल’’, अशी माहिती ‘सेंटर फाॅर पिपल्स कलेक्टिव्ह’चे संशोधक अजिंक्य शहाणे यांनी दिली.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()