मैत्रिणीवर शेरेबाजी केल्याने काढली पिस्तूल; क्षणभरात ढाबा रिकामा झाल्यानंतर सत्य आले समोर

The gun was removed due to an argument during a meal
The gun was removed due to an argument during a meal
Updated on

नागपूर : ढाब्यावर मित्रासोबत जेवण करणाऱ्या मैत्रिणीवर शेजारच्या टेबलवरील टोळीने शेरेबाजी केली. त्याला समजावण्यास गेलेल्या मित्राच्या डोक्यावर टोळीने पिस्तूल रोखली. पिस्तूलचे बॅरेल मागेपुढे करताच ढाब्यावर एकच खळबळ उडाली. सर्वत्र धावपळ होऊन दहा मिनिटांच ढाबा रिकामा झाला. या प्रकरणी बेलतरोडी पोलिसांनी तीन युवकांना अटक केली असून, त्याच्याकडील पिस्तूल जप्त केली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अनूप सिंह (रा. विठ्ठलनगर) हे मित्र-मैत्रिणीसह शुक्रवारी रात्री वर्धा रोडवरील लक्की ढाब्यावर जेवण करायला गेले होते. रात्री साडेबारा वाजताच्या सुमारास जेवण सुरू असताना शेजारच्या टेबलवर जेवण करीत असलेल्या युवकांच्या टोळीने एका महिलेवर शेरेबाजी केली. त्यामुळे अनूप यांचे मित्र हेमंत कुबडे हे त्या टोळीला समज देण्यासाठी त्यांच्या टेबलवर गेले.

आरोपी श्‍वेतांक उर्फ अनिकेत नरसिंग रामटेके (२१), मयूर राजू बनकर (१८, रा. न्यू बाबूलखेडा, रामेश्‍वरी), शुभम संजय सोनी (रा. धोबी घाट, बाबुलखेडा) आणि अन्य दोन साथीदारांनी हेमंतला शिवीगाळ करीत धक्काबुक्की केली. अनिकेतने पाठीमागे लपविलेली पिस्तूल काढली आणि हेमंतच्या डोक्यावर ठेवली. पिस्तूलचे बॅरेल मागे-पुढे करीत ठार मारण्याची धमकी दिली.

अनिकेतच्या हातात पिस्तूल आणि रौद्र रूप पाहताच ढाब्यावर एकच खळबळ उडाली. ग्राहकांनी धावपळ करण्यास सुरुवात केली. काही मिनिटातच ढाबा खाली झाला. एकाने पोलिस नियंत्रण कक्षाला फोन केला.

बेलतरोडी पोलिसांचा ताफा ढाब्यावर पोहोचला. पोलिसांनी तीन आरोपींना अटक केली तर दोन आरोपी पळून गेले. पिस्तूल जप्त करण्यात आली. मात्र, ती पिस्तूल मुलांच्या खेळण्यातील निघाली. याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

संपादन - नीलेश डाखोरे

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()