Hair Dye : हेअर डायचा शोध परदेशात नव्हे तर भारतातच!

डॉ. स्मिता होटे यांचे संशोधन : वराहमिहीर ऋषींच्या ग्रंथात उल्लेख
Hair dye was invented in india dr smita hote research Varahamihira rishi Brihat Samhita
Hair dye was invented in india dr smita hote research Varahamihira rishi Brihat Samhitasakal
Updated on

नागपूर : केसांना डाय लावणे किंवा केस रंगविणे ही बाब काही दशकांपूर्वी भारतीय संस्कृतीला अतिशयोक्ती वाटणारी होती. मात्र, परकीय वाटणाऱ्या याच डायची उत्पत्ती भारतातच झाली, असे सांगितले तर? होय, सहाव्या शतकातील ‘वराहमिहीर ॠषीं’नी डायचा शोध लावला असून नागपूरच्या डॉ. स्मिता होटे यांच्या संशोधनातून ही बाब उघड झाली.

१९०७ मध्ये प्रथम डायची निर्मिती करणारे म्हणून फ्रेंच फार्मासिस्ट युजीन शुलर ओळखले जातात. मात्र, वराहमिहीर ऋषींनी ‘बृहत्संहिता’ या सतराशे वर्ष जुन्या ग्रंथामध्ये डायच्या निर्मितीची प्रक्रीया नोंदवली आहे.

त्यापूर्वीपासूनच याचा वापर होत असल्याचा कयास डॉ. स्मिता होटे यांनी व्यक्त केला आहे. लोह चूर्ण, कोदू धान्य (कोद्रव) आणि आवळा चूर्ण या अस्सल भारतीय पदार्थांचा वापर करून या डायची निर्मिती केल्या जात होती. आताच्या डाय प्रमाणे केमिकलचा वापर त्यात नाही.

औषधी गुणधर्म असलेल्या पदार्थांपासून हा डाय तयार होत असल्याने आरोग्यासही अत्यंत लाभदायक म्हणून ओळखला जातो. बृहत्संहिता या संस्कृत ग्रंथामध्ये मनुष्याच्या आवडीच्या विषयाशी निगडित लिखाण केले आहे.

यामध्ये, सौंदर्यशास्त्राचा (कॉस्मेटोलॉजी) देखील उल्लेख आहे. मनुष्याच्या सौदर्यंशास्त्राशी निगडित वस्त्र, अलंकार, केशभूषा, सौंदर्य या चार अंगांवर वराहमिहीर ऋषींनी लिहिले आहे. त्यामुळे, भारतात वेद काळापासूनच सौंदर्यशास्त्र प्रचलित आणि अत्यंत प्रगत असल्याचे दिसते.

एलएडी कॉलेजच्या संस्कृतच्या माजी विभागप्रमुख असलेल्या डॉ. स्मिता होटे यांनी ‘संस्कृत साहित्यातील प्रसाधन आणि अलंकरण्‌’ या विषयावर पीएचडी केली आहे. डॉ. होटे लवकरच या संशोधनावर पेटंट घेणार आहे.

कोण होते वराहमिहीर ऋषी?

वराहमिहिर ऋषी (जन्म ४९९ - मृत्यू ५८७) हे पाचव्या-सहाव्या शतकातील भारतीय गणितज्ज्ञ आणि खगोलशास्त्रज्ञ होते. उज्जैन (मध्यप्रदेश) येथे त्यांनी विकसित केलेले गणितशास्त्राचे गुरुकुल ७०० वर्षे अनोखे असे होते. वराहमिहीर हे लहानपणापासूनच अतिशय हुशार आणि तेजस्वी होते.

त्यांचे वडील आदित्यदास यांच्याकडून पारंपरिक गणित आणि ज्योतिषशास्त्र शिकल्यानंतर त्यांनी या क्षेत्रात व्यापक संशोधन केले. राजा विक्रमादित्य व्दितीय याने ज्योतिष आणि खगोलशास्त्रातील योगदानामुळे वराहमिहीर ऋषींना त्याच्या दरबारातील नऊ रत्नांमध्ये स्थान देत मगध देशाचा सर्वोच्च सन्मान ‘वराह’ प्रदान केला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.