Nagpur : धक्कादायक! आई-वडिलांकडून छळ, बारा वर्षीय मुलीचे पलायन

Nagpur Crime News : सावत्र आईकडून अभ्यास न केल्याचे आणि इतर कारणे सांगून तिला सातत्याने मारहाण करण्यात येत होती.
harassment by parents twelve-year-old girl escapes from house case registered in juni kamptee police
harassment by parents twelve-year-old girl escapes from house case registered in juni kamptee policeSakal
Updated on

नागपूर : सावत्र आई आणि सख्या पित्याकडून सातत्याने शारीरिक आणि मानसिक छळ होत असल्याने बारा वर्षीय मुलीने पलायन केल्याची धक्कादायक माहिती समोर आली. तिला सातत्याने मिळणाऱ्या क्रुर वागणुकीची दखल बाल न्यायालयाने घेत, आई-वडिलांविरोधात गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले. त्यातून जुनी कामठी पोलिस ठाण्यात दोघांविरोधातही गुन्हा दाखल बाल न्याय कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला आहे.

जुनी कामठी परिसरात राहणाऱ्या मुलीने २१ जून रोजी घरातून पलायन केले. ती सहावीत शिकत होती. याबाबत आई-वडिलांनी कुठलीही तक्रार दिली नव्हती, नातेवाईकांनी दिलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी तिचा शोध घेतला असता, ती बडनेरा रेल्वे स्टेशन येथे आढळली. तिला नागपुरात आणले असता, तिने आई-वडिलांसोबत राहण्यास नकार दिला. दरम्यान तिला बालसुधारगृहात ठेवण्यात आले.

चौकशीदरम्यान दिलेल्या माहितीनुसार, तिच्या सख्या आईचे निधन झाल्याने वडिलांनी दुसरे लग्न केले. मात्र, सावत्र आईकडून अभ्यास न केल्याचे आणि इतर कारणे सांगून तिला सातत्याने मारहाण करण्यात येत होती.

याशिवाय दोघेही तिला जेवणासाठी शिळे अन्न आणि रुममध्ये डांबून ठेवायचे. विशेष म्हणजे, तिला कुणाशीही बोलू वा खेळण्यासाठीही त्यांनी बंदी घातली होती. अनेकदा तिच्या सावत्र आईने तिला जीवे मारण्याची धमकीही दिली होती. त्यामुळे तिने घरातून पलायन केले होते.

तपासात पोलिसांनी तथ्य आढळून येताच, याबाबत त्यांनी बाल न्यायालयात धाव घेतली. यावेळी मुलीने आई-वडिलांसोबत राहण्यास नकार दिला. याशिवाय न्यायालयाने दिलेल्या निर्देशानुसार, आई-वडिलांनी दिलेल्या क्रुर वागणुकीच्या विरोधात जुनी कामठी येथे गुन्हा दाखल करण्यात आला.

यापूर्वी अनेकदा गेली घरून निघून

सावत्र आई आणि सख्या वडिलांकडून सातत्याने मुलीचा मानसिक आणि शारीरिक छळ होत असल्याने बारा वर्षीय मुलीने यापूर्वीही अनेकदा पलायन केले होते. विशेष म्हणजे, तीने पलायन केल्यावर आपल्या नातेवाईकांकडे काही दिवस घालविले. मात्र, काही दिवसांनी तिचे समुपदेशन करीत, तिला पुन्हा आई-वडिलांनी परत आणले. मात्र, त्यानंतरही ते तिला क्रुरतेने वागणूक देत असल्याची बाब समोर आल्याने तिने २१ जूनला पलायन केले होते.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.