नागपूर : चाचण्यांची संख्या वाढल्याने रुग्णांची संख्या वाढत आहे. यामुळे मृत्यू नियंत्रणात ठेवण्यासह मृत्युदर शून्यावर आणण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे. सार्वजनिक आरोग्य विभागातील वैद्यकीय अधिकाऱ्यांना शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात व रुग्णालयात पदस्थापना देण्याबाबत विचार करण्यात येत आहे, अशी माहिती आरोग्य राज्यमंत्री राजेंद्र पाटील यड्रावकर यांनी दिली.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर नागपूर विभागातील शहर व ग्रामीण क्षेत्रातील आढावा घेण्यासाठी आले असता त्यांनी आरोग्य यंत्रणेशी संवाद साधला. संबंधित काही निवडक प्रसारमाध्यमांशीही संवाद साधाला. कोरोनाच्या रुग्णसंख्येमुळे मेडिकल मेयोवरचा ताणही वाढला आहे. येथील मनुष्यबळाची कमतरता लक्षात घेत आरोग्य विभागातील मनुष्यबळ येथे प्रतिनियुक्तीवर पाठवण्याचा विचार सुरू आहे, असेही पाटील म्हणाले.
शहरात सध्या १३,४७८ बाधित रुग्ण असून, त्यापैकी ३,६७९ रुग्ण ग्रामीणचे आहेत. आतापर्यंत ६,३०० रुग्ण ठणठणीत बरे होऊन घरी परतले आहेत. जिल्ह्यातील एकूण मृत्यू संख्या ४६१ असून त्यापैकी ७५ ग्रामीण तर शहरातील ३२६ मृत्यू आहेत. शहरात दगावलेले ६० जण जिल्ह्याबाहेरील रहिवासी आहेत. रुग्ण बरे होण्याचा नागपूर जिल्ह्याचा दर ४६.७४ आहे. विलगीकरणात एकूण ३,२१५, ऑक्सिजन सपोर्टेड २,३७० तर ७२४ खाटा आयसीयूसाठी आरक्षित आहेत. एकूण ५१ कोविड केअर सेंटरमध्ये खाटांची संख्या १४,४२८ आहे.
रुग्ण निदानासाठी ७ शासकीय व ६ खासगी प्रयोगशाळांमध्ये चाचणी होत आहे. आतापर्यंत १ लाख ४१ हजार तपासण्या झाल्या आहेत. ग्रामीण भागात आतापर्यंत २७ हजार ४५ अँटीजेन टेस्ट झाल्या असून, १,४८५ रुग्ण पॉझिटिव्ह आल्याची माहिती आरोग्य सेवा उपसंचालक डॉ. संजय जयस्वाल यांनी दिली. मेडिकलचे अधिष्ठाता डॉ. सजल मित्रा, मेयोचे अधिष्ठाता डॉ. अजय केवलीया, मेडिकलचे वैद्यकीय अधिक्षक डॉ. अविनाश गावंडे, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. देवेंद्र पातूरकर, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. दीपक सेलोकर उपस्थित होते.
जिल्ह्यात आतापर्यंत १२ कोविड रुग्णालय सुरू करण्यात आल्याचे सांगत आणखी २३ रुग्णालये निश्चित केल्याचे सांगण्यात आले. आरोग्य यंत्रणेने सतर्क व सज्ज राहून कोरोनामुक्तीसाठी उपाययोजना कराव्यात, असे राज्यमंत्री पाटील म्हणाले. १२ डेडीकेटेड कोविड रुग्णालये सुरू झालेली असून एकून २३ डेडीकेटेड कोविड रुग्णालये (डीसीएच) निश्चित करण्यात आली आहेत. याव्यतिरिक्त ३४ डी.सी.एच.मध्ये एकूण ४४६ व्हेंटिलेटरर्स आहेत, अशी माहिती त्यांनी दिली.
संपादन - नीलेश डाखोरे
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.