साळवा : राज्य सरकारचे आरोग्य विभागाकडे दुर्लक्ष होत असल्याचे जनतेला चित्र पाहायला मिळत आहे. सरकारला कधी जाग येणार, असा प्रश्न त्यातल्या त्यात निर्माण झाले आहेत.
आरोग्य ही मानवी जीवनातील अत्यावश्यक व मूलभूत सेवा असतांना आरोग्य विभागाचे वैद्यकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांची मोठ्या प्रमाणात असलेले रिक्त पद ग्रामीण भागातील लोकांच्या आरोग्याच्या दृष्टीने गंभीर बाब असून चिंताजनक आहे. जिल्हातील कुही तालुक्यात एक ग्रामीण रुगणालय, चार प्राथमिक आरोग्य केंद्र, आठ आयुर्वेदीक उपकेंद्र व दोन ॲलोपाॅंथिक दवाखाने असून तालुक्यातील जवळपास एक ते सव्वालाख लोकसंख्येच्या आरोग्याची काळजी घेत असते.