Nagpur News : उपचारासाठी दुर्गेश मागतोय भीक

मेडिकलच्या आवारात हृदय हेलावून टाकणारे दृश्य
Durgesh Marathe
Durgesh Marathesakal
Updated on

नागपूर - फाटके आयुष्य आहे. हाताला मिळेल ते काम तो करतो. निराधार माणूस. उपचारासाठी सकाळीच मेडिकलमध्ये आला. रक्त तपासा, एक्स-रे काढा, ६६ नंबरच्या खिडकीत पैसे भरा असे सांगण्यात आले. त्याच्या खिशात दमडी नाही. पैसे आणू कुठून, असा मनाशीच सवाल केला.

अखेर दुःखाला पोटाशी धरून उपचाराला आलेल्या त्या व्यक्तीने मेडिकल परिसरात भीक मागण्यासाठी हात पसरले. भिकेत पैसे मिळाले की उपचार करीन, हे शब्द कानावर आदळले अन् मनात चर्रर्र झाले.

नागपुरातील ३४ वर्षीय दुर्गेश मराठे. ‘निराधार’ अशी कार्डावर नोंद. ७ नोव्हेंबरला जनरल सर्जरी विभागात उपचाराला आला. पायाला झालेल्या जखमांवर पट्टी बांधून होती. उपचारासाठी आल्यानंतर त्याला काही तपासण्या सांगण्यात आल्या. औषधीही लिहून दिली. खिशात पैसे नव्हते. तपासणी करायची कशी?, रक्ताचे नातेवाईक आहेत, परंतु सारेच दुरावलेले. कोणीच सोबतीला नाहीत.

Durgesh Marathe
Motivation News : बेवारस प्रेतांवर ऑटोचालक करतो अंतिम संस्कार

अखेर मेडिकलमधील मुख्य प्रवेशद्वारापासून काही अंतरावर दुर्गेश बसला. समोर प्लॅस्टिकचे पांढरे पोते टाकले. कोण्या एखाद्या व्यक्तीला दया आली की, पोत्यावर पैसे टाकले होते. उपचारासाठी हवे तेवढे पैसे जमा झाले नव्हते. येणाऱ्या जाणाऱ्यांचे त्याच्याकडे लक्ष देत नव्हते. चार दोन रुपये पोत्यावर पडले होते.

कोणीतरी मदत करेल, या विश्वासावर दुर्गेश होता, परंतु पुढील तीन दिवस कोणीही लक्ष दिले नाही. जमिनीवर टाकलेल्या पोत्यावर उपचाराइतके पैसे गोळा झाले की, नाही हे कळायच्या आधी दुर्गेश मात्र दिसेनासा झाला.

उपचारासह पोटाचा प्रश्न

बाह्यरुग्ण विभागातल्या उपचारानंतर मेडिकलच्या आवारात भीक मागणाऱ्या दुर्गेशसमोर आजारापेक्षा पोटाचा मोठा प्रश्न उभा ठाकला आहे. येथील परिसरात येणाऱ्या-जाणाऱ्यासमोर हात पसरून भीक मागत होता, पोटाकडेही बोट दाखवत होता. हे विदारक चित्र बाह्यरुग्ण विभागाजवळच असलेले सारेच उघड्या डोळ्यांनी बघत होते. परंतु सगळ्यांनाच पाझर फुटतो असे नाही.

मागील आठ दिवस भीक मागून दुर्गेशने उपचारासाठी काही पैसे गोळा केले. मात्र त्याच्यावर उपचार झाले की नाही कळले नाही. हृदय हेलावून टाकणारे दृश्य बघितल्यानंतर मेडिकलच्या परिसरातून या रस्त्यावरून जाताना दुर्गेश दिसलाच तर रुपया दोन रुपये देऊन त्याला मदत करावी एवढेच.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.