Kidney Disease : किडनीग्रस्तांसाठी सुपरमध्ये अच्छे दिन कधी?

नेफ्रॉलॉजिस्ट’ची नियुक्ती ः तीन महिन्यांपासून प्रत्यारोपण थांबलेलेच
Kidney Diseases
Kidney Diseasesesakal
Updated on

नागपूर : सुपरमध्ये नेफ्रॉलॉजिस्ट नसल्याने २०१९ च्या अखेरीस किडनी प्रत्यारोपण बंद पडले. त्यातच कोरोनाची महामारी आली. जानेवारी २०२३ मध्ये सुपरमध्ये नेफ्रोलॉजिस्ट डॉ. पीयूष किंमतकर नुकतेच रुजू झाले. यामुळे पुन्हा किडनी प्रत्यारोपण सुरू होईल असा विश्वास होता. मात्र तीन महिने लोटूनही किडनीग्रस्तांसाठी सुपरमध्ये अच्छे दिन आलेच नाही.

सुपरमध्ये विभागप्रमुख डॉ. चारुलता बावनकुळे यांनी स्वेच्छानिवृत्ती घेतल्यानंतर तत्कालीन अधिष्ठाता डॉ. सजल मित्रा, डॉ. सुधीर गुप्ता यांच्या कार्यकाळात सुपरमधील किडनी प्रत्यारोपण बंद होते. सकाळने बाब प्रकाशात आणली. या वृत्ताची दखल घेत नेफ्रोलॉजिस्ट डॉ. किंमतकर यांची नियुक्ती करण्यात आली. मात्र तीन महिने लोटूनही अद्याप किडनी प्रत्यारोपण सुरू न झाल्याने किडनीच्या प्रतीक्षेतील रुग्ण दिवस मोजत असल्याची माहिती पुढे आली आहे.

तीन लाइव्ह किडनी दात्यांची चाचपणी

किडनी प्रत्यारोपणासाठी प्रयत्न सुरू झाले आहेत. चंद्रपूर, गडचिरोली आणि भंडारा जिल्ह्यातील प्रत्येकी एक अशा तीन किडनीच्या प्रतीक्षेतील रुग्णांची चाचपणी झाली. या रुग्णांच्या नातेवाईकांकडून किडनी दान देण्याची तयारी दर्शवण्यासह बऱ्याच तपासण्यासह कागदपत्रांचीही पूर्तताही केली गेली. नुकतेच एका दाणदात्याचा अपघात झाला यामुळे पंधरा दिवसांपूर्वी होणारे किडनी प्रत्यारोपण थांबले आहे.

६६ किडनी प्रत्यारोपण

सुपर स्पेशालिटीच्या किडनी प्रत्यारोपण केंद्रात २०१६ मध्ये ९, २०१७ मध्ये १७, २०१८ मध्ये १३ तर २०१९ मध्ये २१ प्रत्यारोपण झाले. यानंतर ६ प्रत्यारोपण झाले आहे. यात सर्वाधिक मूत्रपिंडदान आईने दिले आहेत. त्याची संख्या ३३ आहे. याशिवाय, वडिलांकडून १०, पत्नीकडून सहा, पतीकडून एक, बहिणीकडून तीन, भावाकडून दोन, मोठ्या वडिलांकडून एक तर ब्रेन डेड म्हणजे मेंदू मृत व्यक्तीकडून आठ किडनी दान झाले आहे.

मेडिकलच्या औषधशास्त्र विभागातील वरिष्ठ निवासी डॉक्टर डायलिसिस युनिटमध्ये सेवा देत आहेत. तर सुपरमध्ये नेफ्रॉलॉजिस्ट यांची नियुक्ती करण्यात आली. तीन लाइव्ह दानदाते लवकरच नातेवाइकांना किडनी देणार आहेत. लवकरच सुपरमधील किडनी प्रत्यारोपण होईल.

-डॉ. राज गजभिये, अधिष्ठाता, मेडिकल-सुपर

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.