Heat Wave In Vidarbha : विदर्भात उष्णतेची लाट, चंद्रपूर सर्वाधिक हॉट

Heat Wave In Vidarbha : कडाक्याच्या उन्हाचा मे महिना आरंभ होताच सूर्यनारायणाने डोळे वटारणे सुरू केले आहे.
Heat Wave In Vidarbha
Heat Wave In Vidarbhaesakal
Updated on

नागपूर : कडाक्याच्या उन्हाचा मे महिना आरंभ होताच सूर्यनारायणाने डोळे वटारणे सुरू केले आहे. दोन दिवसांपासून अचानक ऊन वाढल्यामुळे कमाल तापमानातही वाढ झाली आहे. गुरुवारी नागपुरात ३९.९ अंश सेल्सिअस, तर विदर्भासह राज्यात सर्वाधिक तापमानाची नोंद चंद्रपूर येथे झाली. विदर्भात सध्या कोरडे हवामान असल्यामुळे या आठवड्यात ऊन आणखी तापण्याची शक्यता आहे. शनिवारपासून येलो अलर्ट देण्यात आला आहे.

विदर्भातील उन्हाच्या लाटेने अपेक्षेप्रमाणे तीव्र रूप धारण केले. जवळपास सहा जिल्ह्यांतील तापमान चाळीशीपार गेले आहे. बुधवारी मोसमातील सर्वाधिक ४०.८ अंशांवर गेलेला नागपूरचा पारा किंचित घसरला असला तरी उन्हाचे चटके कायम होते. तर विदर्भ व राज्यात सर्वाधिक तापमानाची नोंद चंद्रपूर येथे ४३ अंश सेल्सिअस करण्यात आली. राज्यात जेऊर येथेही ४३ अंशांची नोंद झाली. याशिवाय अकोल्याचा पारा ४२.३ अंशांवर गेला.

वर्दळ झाली कमी

नागपूरकरांना उन्हाच्या झळा बसू लागल्या आहेत. सूर्य डोक्यावर असताना दुपारी रस्त्यावरील वर्दळ कमी झाली आहे. उन्हापासून बचाव करण्यासाठी नागरिकांना दुपट्टे, टोप्या व गॉगल्सचा आधार घ्यावा लागत आहे. विदर्भात शनिवारपासून येलो अलर्ट देण्यात आला आहे.

मे मध्ये दीर्घ उष्णतेची लाट

भारतीय हवामान विभागाने विदर्भात मे महिन्यात दरवर्षीच्या तुलनेत दीर्घकाळ उष्णतेची लाट राहणार असल्याचा अंदाज व्यक्त केला आहे. या महिन्यात साधारणपणे तीन ते चार दिवस अशी लाट असते. मात्र यावेळी तब्बल पाच ते आठ दिवस उन्हाची तीव्र लाट जाणवणार असल्याचे हवामान विभागातर्फे सांगण्यात आले.

दहा वर्षांत दुसऱ्यांदा सर्वाधिक पाऊस

यावर्षीच्या एप्रिलमध्ये उकाड्याऐवजी अवकाळी पावसाचीच अधिक चर्चा झाली. या दिवसात विदर्भात महिनाभरात तब्बल ४५.२ मिलिमीटर पावसाची नोंद झाली. नागपुरात ३० दिवसांमध्ये ६५.८ मिलिमीटर पाऊस बरसला. सर्वाधिक ११३.६ मिलिमीटर पावसाची नोंद यवतमाळ जिल्ह्यात झाली.

उल्लेखनीय म्हणजे, राज्यात सर्वाधिक पाऊस विदर्भातच पडला आहे. विदर्भात गेल्या दहा वर्षांत दुसऱ्यांदा इतका पाऊस बरसला. गतवर्षी ८१.२ मिलिमीटर पावसाची नोंद झाली होती. एप्रिल महिन्यात दशकातील सर्वाधिक पावसाचा विक्रम १५७.४ मिमीचा आहे, जो २००६ मध्ये पडला होता. त्याच वर्षी १७ एप्रिल रोजी चंद्रपूरमध्ये २४ तासांत सर्वाधिक १५६.४ मिलिमीटर पावसाची नोंद झाली होती.

विदर्भातील तापमान

शहर तापमान

नागपूर ३९.९

अमरावती ४१.४

वर्धा ४१.५

अकोला ४२.३

बुलडाणा ३८.६

यवतमाळ ३९.७

गोंदिया ३९.०

ब्रह्मपुरी ४१.९

वाशीम ४१.८

चंद्रपूर ४३.०

गडचिरोली ४२.०

Heat Wave In Vidarbha
Heat Wave : विदर्भात आजपासून उष्णतेची लाट, नागरिकांनी काळजी घेण्याची गरज

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.