हेल्मेटसक्तीच्या कारवाईत चौपटीने वाढ

नऊ महिन्यांत ४ लाख ३८ हजारांवर कारवाई
Helmet Use Enforcement
Helmet Use Enforcementsakal
Updated on

नागपूर : शहरात वर्दळ वाढल्याने अपघाताचा धोका अधिक असतो. अपघातात अनेकदा डोक्याला गंभीर दुखापत होऊन जीव जाण्याचे प्रमाण अधिक असल्याने शहरात हेल्मेटसक्ती करण्यात आली. मात्र, या सक्तीला न जुमानता सर्रासपणे हेल्मेटशिवाय दुचाकीवरून फिरताना नागरिक दिसून येतात. त्यातूनच गेल्या ९ महिन्यांत सव्वाचार लाख दुचाकी चालकांवर हेल्मेटची कारवाई करण्यात आली. विशेष म्हणजे गेल्यावर्षी हा आकडा केवळ दीड लाख होता हे विशेष.

शहरात डिसेंबर महिन्यापासून नवीन दंड आकारणी करण्याचे आदेश वाहतूक पोलिस विभागाने काढले. त्यानुसार दंडाची रक्कम बघता, वाहतुकीच्या नियमांचे पालन केल्या जाईल असे विभागाला वाटत होते. मात्र, त्याच्या विपरीत शहरातील नागरिक त्याला तोडण्यावर अधिक भर देताना दिसून येतात. विशेष म्हणजे शहरात हेल्मेटसक्ती असतानाही वाहतूक पोलिसांची नजर चुकवून दुचाकीस्वार सिग्नलवरून निघून जाण्याचा प्रयत्न करतो.

त्यातून अपघातही होताना दिसून येतात. १ जानेवारी ते ३० सप्टेंबरदरम्यान ४ लाख ३८ हजार ३४२ दुचाकीस्वारांवर विना हेल्मेटची कारवाई करण्यात आलेली आहे. ही कारवाई गेल्यावर्षी १ जानेवारी ते ३० सप्टेंबरदरम्यान १ लाख ५९ हजार ५०२ इतकी होती. त्यामुळे गेल्या वर्षीच्या तुलनेत ही कारवाई चौपट वाढल्याचे दिसून येते.

एमआयडीसी टॉप

वाहतूक विभागाच्या दहा विभागांमध्ये सर्वाधिक ८० हजार २९४ कारवायांची एमआयडीसी वाहतूक विभागात गुन्ह्यांची नोंद करण्यात आली. याशिवाय सर्वात कमी लकडगंज विभागात ६३ हजार ९४८ कारवाई करण्यात आली.

अपघातात २१० जणांचा मृत्यू

एकीकडे हेल्मेट, सिल्ट बेल्ट, मोबाईलचा वापर, ट्रॅफिक सिग्नल तोडणे आणि ड्रंकन ड्राईव्ह अशा प्रकाराने शहरात गेल्या ९ महिन्यात ७८४ अपघातांची नोंद करण्यात आली आहे. यामध्ये २१० जणांना आपला जीव गमवावा लागला आहे. विशेष म्हणजे ३२८ जणांना गंभीर दुखापत तर २२२ जणांना किरकोळ जखमी झाले आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.