अरे, हे काय सुरू आहे? ‘लम्पि’च्या आडून शेतकऱ्यांची लूट!

file
file
Updated on

कळमेश्वर( जि.नागपूर): एकीकडे कोरोनाचा प्रादुर्भाव सुरू असताना आता जनावरांना लम्पी स्किन डिसीज या चर्मरोगाची लागण सुरू झाली आहे. याचा दिवसागणिक विळखा वाढत चालला आहे. आतापर्यंत तालुक्यातील सात हजारांच्यावर जनावरांना लम्पीची लागण झाल्याने पशुपालकांमध्ये चिंतेचे वातावरण पसरले आहे. पशुवैद्यकीय विभागात उपचारात दिरंगाई होत असल्याची बाब उघड झाली असून लसींवरून शेतकऱ्यांची मोठ्या प्रमाणात फसवणूक केली जात असल्याच्या शेतकऱ्यांकडून होत आहेत.

मोठी बातमी : शेतकऱ्यांना वीजजोडणीसाठी कर्ज उभारणी, या मंत्र्यांनी दर्शविली तयारी

वेळीच होत नाही उपचार      
सध्या कळमेश्वर तालुक्यात जनावरांना या आजाराची लक्षणे मोठ्या प्रमाणात दिसून येत आहे. सात हजाराच्यावर जनावरांना लम्पीची लागण झाली असून ही साथ आटोक्यात येत नसल्याने शेतकरी चिंताग्रस्त झाले आहेत. तालुक्यात ४० हजारांच्या आसपास पशुधन आहे. पशुवैद्यकीय दवाखाना श्रेणी-१ चे कळमेश्वर व श्रेणी-२ चे मोहपा असे मिळून दहा सेंटर आहेत. या सर्व पशुदवाखान्यातून लम्पीबाबत पशुधनाची काळजी दिवस-रात्र घेतली जात आहे. कळमेश्वर येथील पशुवैद्यकीय दवाखान्यात दररोज शंभर ते दीडशे जनावरांना लम्पीचा उपचार पुरेशा मनुष्यबळाअभावी सुरु असून जनावरांना वेळीच उपचार मिळत नाही, हे विशेष.

अशी होते शेतकऱ्यांची लुबाळणूक
कळमेश्वर तालुक्यात लम्पी स्किन डिसीजने जनावरांना ग्रासले असताना काही सेंटरच्या पशुवैद्यकांकडून बनावट कारणे सांगून व बाहेर असल्याचे सांगून नंतर खासगीत भेटून शेतकऱ्यांची आर्थिक लूट करण्यात येत आहे. लंम्पीची लस पशुचिकित्सालयात उपलब्ध असतानाही  ती नसल्याचे भासवून  हितसंबंध असलेल्या औषधी दुकानातून विकत आणायला लावणे, आापल्या जवळच्या बॅगमधील इंजेक्शन लावून शेतकऱ्याकडून मोठ्या प्रमाणानात पैसे उकळले जात आहे. यात मोठी लूट होत असल्याचे शेतकरी सांगत आहेत.

काय आहे लम्पि डीसीज?
* या आजारात जनावरांच्या डोळे व नाकातून पाणी येते.
* लसिका ग्रंथीना सूज येते.
* शरिरावर कडक व गोल आकाराच्या गाठी येत आहेत.
* मरत मरतुकीचे प्रमाण कमी असले तरी बाधित जनावरे अशक्त होतात.
* दूध उत्पादन घटते.
* काही वेळा गर्भपात होतो.
* प्रजनन क्षमता घटते.

या आजारावर हे आहेत उपाय
* हा आाजार विषाणूजन्य असल्याने यावर खात्रीशीर उपचार होऊ शकत नाही.
* यामध्ये जनावरांना प्रतिकार शक्तीवर्धक औषधे देणे आावश्यक आहे.

औषधी विनाशुल्क उपलब्ध
सद्यस्थितीत कळमेश्वर तालुक्याला लम्पी स्किन डिसीजच्या प्रती सेंटरनुसार एकूण पाच हजार लसेस उपलब्ध झालेल्या आहेत. १० सेंटरच्या माध्यमातून गावागावात कॅम्प घेऊन जनावरांना लावण्यात येत आहेत. कर्मचारी संख्या कमी असतानासुद्धा लम्पी रोगावर नियंत्रण मिळते आहे. लम्पि स्किन डिसीज हा आजार विषाणूजन्य आजार असल्याने शेतकरी बांधवांनी न घाबरता अशा आाजाराची लक्षणे आाढळल्यास पशुवैद्यकाशी संपर्क करावा, तसेच सर्व औषधी पशुवैद्यकीय दवाखान्यात विनाशुल्क उपलब्ध आहेत.
डॉ.जयश्री भुगावकर
तालुका पशुधन विकास अधिकारी, कळमेश्वर

संपादनः विजयकुमार राऊत

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.