उपराजधानीत पुन्हा ‘हायॲलर्ट’; दीक्षाभूमीला छावणीचे स्वरूप

दीक्षाभूमीवर बंदोबस्ताचा आढावा घेताना पोलिस आयुक्त अमितेश कुमार, सहआयुक्त अश्‍वती दोरजे आणि पोलिस अधिकारी
दीक्षाभूमीवर बंदोबस्ताचा आढावा घेताना पोलिस आयुक्त अमितेश कुमार, सहआयुक्त अश्‍वती दोरजे आणि पोलिस अधिकारीदीक्षाभूमीवर बंदोबस्ताचा आढावा घेताना पोलिस आयुक्त अमितेश कुमार, सहआयुक्त अश्‍वती दोरजे आणि पोलिस अधिकारी
Updated on

नागपूर : दसरा आणि दुर्गादेवी विसर्जनादरम्यान कोणतीही अनुचित घटना घडू नये म्हणून उपराजधानीत ‘हायॲलर्ट’ घोषित करण्यात आला आहे. शहरात पोलिसांनी चोख बंदोबस्ताचे नियोजन केले आहे. आयुक्त आणि सहआयुक्तांनी गुरुवारी दुपारी दीक्षाभूमीवरील सुरक्षाव्यवस्थेचा आढावा घेत पोलिस अधिकाऱ्यांना ॲलर्ट राहण्याच्या सूचना दिल्या आहेत.

काही दिवसांपासून उपराजधानी हायॲलर्टवर आहे. त्यामुळे पोलिस आयुक्त अमितेश कुमार आणि सहआयुक्त अश्‍वती दोरजे यांनी शहरात चोख बंदोबस्ताचे नियोजन केले आहे. कोराडी देवी मंदिर, आरएसएस मुख्यालय, बेझनबाग, दीक्षाभूमी, ड्रॅगन पॅलेस-कामठी येथील सुरक्षा व्यवस्थेचाही पोलिस आयुक्तांनी आढावा घेतला.

दीक्षाभूमीवर बंदोबस्ताचा आढावा घेताना पोलिस आयुक्त अमितेश कुमार, सहआयुक्त अश्‍वती दोरजे आणि पोलिस अधिकारी
‘टू फिंगर्स टेस्ट’बाबत गांभीर्याने विचार करणे गरजेचे

शहरात येणाऱ्या आठही सीमा सील करण्यात आल्या असून प्रत्येक संशयित वाहनांची झाडाझडती घेण्यात येत आहे. दीक्षाभूमीला सध्या पोलिस बंदोबस्तामुळे छावणीचे स्वरूप आलेले आहे. दीक्षाभूमीवर येणाऱ्या भीमअनुयायांचे व्हॅक्सिनेशन आणि रॅट चाचणी करण्यात येत आहे. नवरात्रोत्सव संपत असून शेवटच्या दिवशी विसर्जनाच्या बंदोबस्तासाठी पोलिस सज्ज आहे.

मार्ग, सुरक्षेव्यवस्थेचे नियोजन

नाईक तलाव, फुटाळा तलाव आणि शुक्रवारी तलावावर बंदोबस्त लावण्यात आला आहे. कोराडी देवी मंदिरात योग्य बंदोबस्त सुरू असून २०० कर्मचारी अतिरिक्त बंदोबस्तासाठी तैनात केले आहेत. कामठीतील ड्रॅगन पॅलेस येथे कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. त्यामुळे तेथे ६०० पोलिस कर्मचाऱ्यांचा बंदोबस्त लावण्यात आला आहे. यासोबतच भंते नागार्जुन सुरेई ससाई यांच्या मार्गदर्शनात दीक्षा कार्यक्रम बेझनबागमध्ये आयोजित करण्यात आला आहे. तेथेसुद्धा पोलिसांचा चोख बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.