Holi Festival 2023 : होळीसाठी कोंबिंग ऑपरेशन

शहरात ४० ठिकाणी पोलिसांची नाकाबंदी : ६० संवेदनशील स्थळांचा समावेश
Holi Festival 2023 Combing operation police blockade 40 places in nagpur
Holi Festival 2023 Combing operation police blockade 40 places in nagpuresakal
Updated on

नागपूर : होळी आणि धुलिवंदनाच्या पार्श्‍वभूमीवर कुठलाही गैरप्रकार होऊ नये यासाठी गुन्हेगारांवर नियंत्रण ठेवण्यासाठी ६० संवेदनशील ठिकाणी पोलिसांद्वारे कोंबिंग ऑपरेशन राबविण्यात येणार असल्याची माहिती पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी दिली.

शहरात ६ ते ८ मार्चदरम्यान ४० ठिकाणी बंदोबस्त आणि ड्रंक ॲण्ड ड्राईव्ह तपासणीची कारवाई करण्यात येणार असल्याचे पोलिस आयुक्तांनी दिली. होळी आणि धुलिवंदनाची शहरात धूम असते. दारूच्या नशेत हुल्लडबाजी करणे आणि गुन्हेगारी प्रवृत्तीच्या माध्यमातून विविध कारवाया करण्यावर समाजकंटकांचा भर असतो.

विशेष म्हणजे नागरिकांना शांततेत सण साजरा करता यावा यासाठी शहर पोलिसांनी चोख बंदोबस्ताची योजना आखली आहे. शहरातील कायदा व सुव्यवस्था अबाधित राखणे व नागरिकांच्या सुरक्षेसाठी प्रत्येक मुख्य चौकात पोलिस नाकाबंदी मोहीम राबविणार आहे.

शाळकरी मुला-मुलींचे वसतिगृह, महिलांच्या वसतिगृहाजवळ फिक्स पॉईंट लावण्यात आले आहेत. या परिसरात पोलिस सलग गस्त करणार आहेत. वाहतुकीचे नियम मोडणारे, दारूच्या नशेत वाहन चालविणारे, बेदरकारपणे वाहन चालविणाऱ्यांविरुद्ध कडक कारवाई केली जाणार आहे.

सराईत गुन्हेगार तपासण्यासाठी परिमंडळातील पोलिस उपायुक्तांच्या देखरेखीखाली गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षकांचा समावेश असलेले पथक तयार करण्यात आले आहेत. हे पथक प्रत्येक झोनमधील झोपडपट्टी आणि संवेदनशील भागांची तपासणी करणार आहे.

असे असतील अधिकारी

होळीच्या बंदोबस्तामध्ये ५ पोलिस उपायुक्त, १० सहायक आयुक्त, ४० पोलिस निरीक्षक, २०८ सहायक निरीक्षक व पोलिस उपनिरीक्षक तसेच पुरुष आणि महिला पोलिस असे एकूण ३ हजार ५०० ते ४ हजार पोलिसांवर होळी-धुलिवंदनाच्या बंदोबस्ताची जबाबदारी देण्यात आली आहे.

शांतता समितीची बैठक

धुलीवंदन आणि मुस्लिमांचा पवित्र सण असलेला ‘शब्बेबारात’ एकाच दिवशी आल्याने या दिवशी कुठलाही जातीय व धार्मिक द्वेष निर्माण करणाऱ्या घटना घडू नये यासाठी पोलिसांद्वारे प्रत्येक पोलिस ठाण्यामध्ये शांतता समितीच्या बैठका पोलिसांद्वारे घेण्यात येत आहे.

तिसरा डोळा ठेवणार लक्ष

शहरातील मुख्य मार्गावर सीसीटीव्ही कॅमेऱ्याच्या तसेच सीओसीच्या माध्यमातून वातावरणावर लक्ष ठेवण्यात येणार आहे. हातभट्टी तसेच अवैधदारू विक्री करणारे, शस्त्रे बाळगणारे आणि सराईत गुन्हेगारांविरुद्ध धडक कारवाई सुरू करण्यात आली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.