धोक्याचे संकेत मिळत असतानाही कोणतीही विवेकी मुलगी पहिल्यांच भेटीत मुलासोबत थेट हॉटेलच्या रूममध्ये जाणार नाही, असे निरीक्षण नोंदवीत मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने बलात्कारप्रकरणी दोषी ठरविलेल्या तरुणाला निर्दोष मुक्त केले.
या मुलीने आपली बाजू मांडताना फेसबुकद्वारे दोषीला भेटल्याचा दावा करीत फोनवर एकमेकांशी चॅटिंग आणि संवाद सुरू झाल्याचे नूमद केले होते. पुढे अत्याचाराचा आरोप केला होता. परंतु, न्यायालयाने तिच्या या दाव्यावर विश्वास ठेवण्यास नकार दिला. न्यायमूर्ती गोविंद सानप यांनी हा निर्णय दिला.