नागपूर : स्पर्धा परीक्षेसाठी तुम्हाला तुमच्या आयुष्याची तीन-चार वर्षेच द्यायची आहेत. परंतु जो वेळ द्याल तो पूर्ण ताकदीनिशी द्या. या दिवसांत स्वतःला अभ्यासात झोकून द्या. नक्कीच उद्याची सकाळ तुमचीच असेल, असा मौलिक सल्ला यूपीएस्सी परीक्षेत ४२ वे स्थान मिळविणारे नागपूरकर समीर खोडे तरुणांना देतात.
आपयश तर येणारच; परंतु याच अपयशातून फिनिक्स भरारी घ्या, असे सांगण्यासही ते विसरत नाहीत. यूपीएस्सीत घवघवीत यश मिळविणाऱ्या समीर यांच्याशी संवाद साधला असता त्यांनी तरुणांना उपयुक्त अशी माहिती दिली.
समीर - माझ्या लहान भावानेसुद्धा यूपीएसस्सीत यश मिळवले. स्पर्धा परीक्षेच्या माध्यमातूनच त्याची इपीएफओमध्ये निवड झाली. त्याच्या पावलावर पाऊल ठेवून मीसुद्धा सात वर्षे खाजगी नोकरी केल्यानंतर स्पर्धा परीक्षेकडे वळलो. सुरुवातीला मी लखनऊ विद्यापीठातून आयएम केले आणि त्यानंतर नागपूर व्हीएनआयटीमधून इंजिनिअरिंग केले आणि आता यूपीएसस्सी क्रॅक केली. त्यामुळे माझ्या मते तरी शिक्षणाला कोणतेही बंधन नसते. फक्त तुमची इच्छाशक्ती हवी. तुम्ही काहीही करू शकता.
समीर - अपयश ही यशाची पहिली पायरी आहे. त्यामुळे सतत परीक्षा देत राहिले पाहिजे. शून्यापासून सुरुवात करण्याची तयारी असू द्यावी. वाचन वाढवले पाहिजे. सतत अवेअर असले पाहिजे.
दररोज येणारे वृत्तपत्र हेच स्पर्धा परीक्षेसाठी तुमच्या हाती येणार मोठा दस्तऐवज आहे. त्यामुळे दररोज ते वाचलेच पाहिजे. सर्वच बाबतीतील ज्ञान त्यातून मिळते. यूपीएसस्सीची तयारी म्हणा किंवा इतर कोणत्याही परीक्षेची पेपर सेट हाताळले पाहिजेत. समरी वाचावी. याशिवाय एनसीईआरटीची पुस्तके रेफर करून पाया पक्का करावा.
कोणतीही गोष्ट एका प्रयत्नात मिळत नाही. मुळात ती मिळू नये. कारण त्याशिवाय तुम्हाला त्याचे मोल कळणार नाही. आलेले फेल्युअर विसरून पुढे गेले पाहिजे. अर्थात त्यात झालेल्या चुका पुन्हा होणार नाही, यावर लक्ष असलेच पाहिजे. मला पहिल्या प्रयत्नात आॅप्शनलमध्ये कमी गुण होते. त्यामुळे त्यावर मी भरपूर अभ्यास केला आणि त्रुटी दूर केली.
प्रत्येकाने आपल्या आवडीनुसार क्षेत्र निवडले पाहिजे. कारण संधी प्रत्येक क्षेत्रा आहेत. विशेष म्हणजे स्पर्धा परीक्षेची तयारी करताना काहीतरी बॅकअप तुमच्यासोबत असला पाहिजे. त्यामुळे आलेल्या अपयशाने निराश न होता तुम्हाला तुमचे क्षेत्र बदलता येईल.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.