Nagpur University : नागपूर विद्यापीठाच्या संकेतस्थळावर ३ जूनपासून नोंदणी सुरु

बारावीच्या निकालानंतर महाविद्यालयांमध्ये पदवी अभ्यासक्रमात प्रवेशासाठी विद्यार्थ्यांना आवश्‍यक गुणपत्रिका मिळण्यास सुरुवात झाली. त्यामुळे विद्यापीठाने नोंदणी प्रक्रियेच्या वेळापत्रकाची घोषणा केली.
Students
Studentssakal
Updated on

नागपूर - बारावीच्या निकालानंतर महाविद्यालयांमध्ये पदवी अभ्यासक्रमात प्रवेशासाठी विद्यार्थ्यांना आवश्‍यक गुणपत्रिका मिळण्यास सुरुवात झाली. त्यामुळे विद्यापीठाने नोंदणी प्रक्रियेच्या वेळापत्रकाची घोषणा केली. त्यानुसार विद्यार्थ्यांना महाविद्यालयात प्रवेशासाठी जाण्याआधी विद्यापीठाच्या संकेतस्थळावर ३ ते २५ जूनपर्यंत नोंदणी करायची आहे.

नागपूर विद्यापीठाने गेल्यावर्षी पदवी प्रथम वर्ष प्रवेशादरम्यान समान वेळापत्रक प्रसिद्ध केले होते. यंदादेखील विद्यापीठाने प्रवेशप्रक्रियेसाठी समान वेळापत्रक देण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार बारावीचा निकाल लागल्यापासून २५ जूनपर्यंत नोंदणी करून सर्व कागदपत्रे अपलोड करायची आहेत.

मात्र, विद्यापीठाच्या संकेतस्थळावर नोंदणी करून कागदपत्र अपलोड केल्याशिवाय विद्यार्थी महाविद्यालयामध्ये प्रवेश घेण्यास पात्र ठरणार नाही. त्यामुळे विद्यार्थ्यांना विद्यापीठाच्या संकेतस्थळावर कागदपत्रांची नोंदणी करणे बंधनकारक आहे.

त्यानंतर महाविद्यालयांना गुणवत्ता यादी व प्रतीक्षा यादी २८ जूनला जाहीर होणार आहे. तसेच २८ जून ते ०४ जुलैदरम्यान गुणवत्ता यादीनुसार प्रवेश निश्चित करावयाचे आहेत. रिक्त जागांवर प्रतीक्षा यादीतील प्रवेश ०५ ते ०८ जुलैदरम्यान निश्चित करावयाचे आहे.

आवश्यकता पडल्यास समुपदेशन व ‘स्पॉट अडॅमिशन’ करता येणार आहे. विद्यापीठाने सदर वेळापत्रकाचे काटेकोरपणे पालन करण्याचे निर्देश महाविद्यालयांना दिले आहे. गेल्यावर्षी नियमांचे पालन न करणाऱ्या महाविद्यालयांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली होती.

असे आहे प्रवेशाचे वेळापत्रक

  • विद्यापीठ संकेतस्थळावर नोंदणी – ०३ ते २५ जून

  • अर्जाची विक्री व स्वीकार – ०१ ते २५ जून

  • गुणवत्ता यादी – २८ जून

  • प्रवेश निश्चिती – २८ जून ते ०४ जुलै

  • प्रतीक्षा यादीनुसार प्रवेश – ०५ ते ०८ जुलै

‘कट ऑफ’ वाढणार

निकालासोबतच मागील वर्षीच्या तुलनेत विद्यार्थ्यांच्या टक्केवारीत वाढ झाल्याने यावर्षी प्राविण्य श्रेणीत (७५ टक्क्याच्या वर) विभागात ११ हजार २४ तर प्रथम क्रमांकावर येणाऱ्या विद्यार्थ्यांची ४१ हजार ९६७ इतकी आहे. मागील काही वर्षांत पारंपरिक अभ्यासक्रमांकडे विद्यार्थ्यांचा कल वाढला आहे.

यामुळे पारंपरिक व अव्यावसायिक अभ्यासक्रमात प्रवेशासाठी चांगलीच चुरस पाहायला मिळते. निकाल आणि वैयक्तिक टक्केवारीत वाढ झाल्याने पारंपरिक अभ्यासक्रमांच्या महाविद्यालयांत प्रवेशाचा ‘कट ऑफ’ वाढण्याची होण्याची शक्यता आहे.

अकरावीसाठी सात हजार विद्यार्थ्यांची नोंदणी

नागपूर - अकरावीच्या पहिल्या टप्प्यातील अर्ज नोंदणीस २४ पासून सुरुवात झाली. त्यात आतापर्यंत ७ हजार ३४ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली. शहरासह मुंबई महानगर क्षेत्र, पुणे, पिंपरी-चिंचवड, नाशिक, अमरावती महानगरपालिका क्षेत्रांतील इयत्ता अकरावीची प्रवेश प्रक्रियेद्वारे प्रवेश देण्यात येणार आहे. त्यानुसार अकरावी प्रवेशासाठी पहिल्या टप्प्यातील नोंदणीला सुरुवात झाली.

विशेष म्हणजे, यंदा या प्रक्रियेला मुख्याध्यापक संघ आणि संस्थाचालक संघटनेकडून विरोध होत आहे. मात्र, सरकारने प्रथम टप्प्यातील नोंदणीला सुरुवात केली. त्यानुसार सध्या सात हजार ३४ विद्यार्थ्यांनी पहिल्या टप्प्यातील नोंदणी केली असून, त्यातील ४ हजार ४७० अर्ज लॉक करण्यात आले असून त्यापैकी ३ हजार ३८७ अर्जांची छाननी करण्यात आलेली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.