नागपूर : मागील काही दिवसांपासून नाना पटोले आपल्या वक्तव्यामुळे सतत चर्चेत आहे. कधी स्वबळाचा नारा, तर ऊर्जाखात्यातील भ्रष्टाचारावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना लिहिलेले पत्र तर कधी सभेत घरात घुसून वार करण्याची भाषा (Chief Minister Uddhav Thakare) वापरल्याने ते चांगलेच प्रकाश झोतात आले आहे. यामुळे महाविकासआघाडीत (sharad pawar) फूट पळल्याचे बोलले जात होते. काँग्रेस, शिवसेना व राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये मतभेद नाही. माझ्या वक्तव्याचा विपर्यास केल्याचे स्पष्टीकरण काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Congress state president Nana Patole) यांनी वृत्तवाहिनीला मुलाखतीत दिले. (I-present-the-role-of-the-party-Nana-Patole's-explanation-on-the-dispute)
स्वबळाच्या नाऱ्यामुळे भाजपच्या पायाखालची जमीन सरकली आहे. भाजपच्या पायाखालची वाळू सरकेल असे मी बोललो होतो. काँग्रेस, शिवसेना व राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये मतभेद नाही. तसेच काँग्रेसची माझ्यावर कोणतीही नाराजी नाही. भाजपकडून फूट पाळण्याचे प्रयत्न केले जात आहे. मात्र, त्यांचे प्रयत्न कधीही यशस्वी होणार नाही. राज्य सरकार अस्थिर करण्याचा भाजपचा प्रयत्न आहे. असे स्पष्टीकरण सेना, राष्ट्रवादीच्या पायाखालची वाळू सरकरल्याच्या वक्तव्यावर नाना पटोले यांनी दिले.
माझ्या वक्तव्याचा विपर्यास केला गेला आहे. माझे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी बोलणे झाले आहे. नाराजी लवकरच दूर होईल. तिन्ही पक्ष एकत्र आहे. महाविकासआघाडीचे सरकार पाच वर्ष नक्कीच टिकेल. आमच्यात फूट पाडण्याचे प्रयत्न करणारे अपयशी होतील. आमचा विरोध भाजप आणि केंद्राला आहे. आम्ही फक्त पक्षाची भूमिका मांडतो. मला मंत्रिपदाची लालसा नाही. मंत्रिपद घ्यायचे असत तर पहिल्याच दिवशी घेतले असते. सौदे करून राजकारण मी कधीच केले नाही, असेही ते म्हणाले.
शरद पवार मोठे नेते
नाना पटोले यांनी एका कार्यक्रमात घरात घुसून वार करण्याची भाषा वापरली होती. यावरून चांगलेच वादंग निर्माण झाले होते. नाना पटोलेच्या वक्तव्यावर भाष्य करताना राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी ‘नाना पटोले हे छोटे नेते आहे. त्यांच्या वक्तव्यावर मी भाष्य करणार नाही. सोनिया गांधी बोलल्या असत्या तर मी बोललो असतो असे म्हटले होते’. यावर त्यांनी शरद पवार हे मोठे नेते आहे. त्यांच्यावर मी नाराज नाही, असे स्पष्टीकरण दिले.
शिवसेना पुन्हा भाजपसोबत जाणार नाही
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आपल्या पक्षाच्या कार्यकर्त्यांना कामाला लागा, असे म्हटले होते. सगळेच पक्ष कामाला लागलेले असतात. पाच वर्ष कुणीही वाट पाहत बसत नाही. त्यांच्या बोलण्याचा कुणालाही राग आला नाही. मग माझ्या बोलण्याचाच का? सर्व पक्ष आपापल्या विभागाच्या भल्याचा विचार करून भूमिका ठरवत असतात. शिवसेना पुन्हा भाजपसोबत जाणार नाही, असेही नाना पटोले म्हणाले.
अजित पवारांनी बोलवले तर भेट घेणार
आमचा विरोध भाजप आणि केंद्राला आहे. आमच्यात कोणतीही फूट किंवा नाराजी नाही. माझ्या वक्तव्याने अजित पवार नाराज असल्याचे बोलले जात आहे. मात्र, असे काहीही नाही. हा फूट पाडण्यासाठी केला जात असलेला प्रयत्न आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर माझी नाराजी नाही. त्यांनी बोलावले तर भेट घेणार, असेही नाना पटोले म्हणाले.
(I-present-the-role-of-the-party-Nana-Patole's-explanation-on-the-dispute)
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.