देवलापार : देवलापार या आदिवासीबहुल भागातील आणखी एक शेतकरी वाघाचा बळी ठरला. वाघाने त्याला नुसते मारलेच नाही, तर त्याचे भक्षणही केल्याने अनेकांच्या अंगावर शहारे आले आहेत. सुखराम गुंटु सर्याम (वय ५५, जमुनिया टोयापार) असे मृत शेतकऱ्याचे नाव असून ते मंगळवारी (ता.१५)रात्रीच्या सुमारास शेतावर जाताना ही घटना घडली. मात्र ती बुधवारी सकाळी नऊ वाजताच्या सुमारास उघडकीस आली.