Tuberculosis Disease
Tuberculosis Diseaseesakal

Tuberculosis Disease : ११९ रुग्णांच्या तपासणीत ३० जणांना लक्षणे,मेयोत क्षयरोगाचे भय वाढले

Tuberculosis Disease : कोरोनानंतर श्वसनविकारांकडे गांभीर्याने बघण्यास सुरुवात झाली.
Published on

Tuberculosis Disease : कोरोनानंतर श्वसनविकारांकडे गांभीर्याने बघण्यास सुरुवात झाली. क्षयरोग श्वसनाचाच एक विकास असून, त्याच्या उच्चाटनाचा दावा केंद्राकडून होत असतानाच इंदिरा गांधी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील छाती व उर रोग विभागात ११९ जणांच्या श्वसन विकाराचे सूक्ष्म निरीक्षण करण्यात आले. यात ३० जणांना क्षयरोगाची प्राथमिक लक्षणे आढळली. विशेष म्हणजे, सर्व रुग्ण कामगार कष्टकरी वर्गातील असल्याची माहिती पुढे आली.

जागतिक क्षयरोग दिनाचे निमित्त साधून मिशन स्किनिंग उपक्रमाअंतर्गत मेयोत ११९ रुग्णांच्या श्वसन विकाराची तपासणी केली. यात टीबीची प्राथमिक लक्षणे आढळलेल्या ३० जणांमध्ये ६ क्षयरोगाचे ॲक्टिव्ह रुग्ण आढळले.

भविष्यात त्यांना एमडीआरचा धोका असल्याचेही दिसून आले. हे अतिशय भयावह चित्र असताना या विभागाला दुर्लक्षित ठेवले असल्याची तक्रार रुग्णांच्या नातेवाइकांकडून करण्यात आली.

Tuberculosis Disease
Health Care : अवकाळी पावसानंतर सावधगिरी बाळगा; सर्दीसह दमा, श्वसन विकारात होते वाढ

धुळीत काम करणाऱ्यांना जोखीम

शरीराला प्राणवायूचा पुरवठा करणारी श्वसन यंत्रणा जंतुसंसर्गामुळे धोक्यात येण्याची जोखीम आहे. धूम्रपानाचा अतिरेक, वाढत्या प्रदूषणामुळे ही जोखीम बळावत आहे. याशिवाय विदर्भाला खाण आणि कोळशापासून वीज निर्मिती करणाऱ्या केंद्रांचा अस्वस्थ शेजार लाभला आहे. त्यामुळे धुळीत काम करणाऱ्यांना क्षयरोग आणि श्वसन रोगाचा सर्वाधिक धोका असतो. ही गरज लक्षात घेता मेयो रुग्णालयात क्षयरोगाचे स्क्रिनिंग करण्याचा कार्यक्रम घेण्यात आला.

कामगारांची तपासणी

मेयो परिसरात सध्या पायाभूत सुविधांची अनेक कामे सुरू आहेत. यात नव्या इमारतींपासून ते बांधून तयार असलेल्या इमारतींमध्ये फर्निचर, उपकरणे कार्यान्वित करण्यासारखी कामे वेगाने केली जात आहेत. त्यासाठी मोठ्या प्रमाणात कष्टकरी, मजूर मेयो परिसरात काम करीत आहे. त्यामुळे या कष्टकरींच्या आरोग्याचे स्क्रिनिंग व्हावे, यासाठी मेयोच्या वतीने येत्या महाराष्ट्र दिनी सर्व कष्टकरी मजुरांचे स्क्रिनिंग केले जाणार आहे.

Tuberculosis Disease
Summer Care: उन्हाळ्यात लहान मुलांना एसी अन् कुलरमध्ये झोपवत असाल तर या गोष्टींची घ्या काळजी

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.