Nagpur News : व्यापारी मुलाच्या तणावात वडिलांनी घेतला टोकाचा निर्णय ;नऊ सुपारी व्यापाऱ्यांना अटक,१८ जणांवर गुन्हा

व्यापारी मुलाने घेतलेल्या कर्जासाठी व्यापारी तगादा लावत असल्याने तो तणावात होता. याची माहिती वडिलांना कळल्याने तणावात त्यांनी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक माहिती समोर आली. विशेष म्हणजे, याप्रकरणी शांतीनगर पोलिसांनी १८ जणांविरुद्ध आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल करून ९ सुपारी व्यापाऱ्यांना अटक केली.
Nagpur News
Nagpur Newssakal
Updated on

नागपूर : व्यापारी मुलाने घेतलेल्या कर्जासाठी व्यापारी तगादा लावत असल्याने तो तणावात होता. याची माहिती वडिलांना कळल्याने तणावात त्यांनी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक माहिती समोर आली. विशेष म्हणजे, याप्रकरणी शांतीनगर पोलिसांनी १८ जणांविरुद्ध आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल करून ९ सुपारी व्यापाऱ्यांना अटक केली.

भरत उर्फ भोलू मोहनदास चुग (वय ४४,रा. तुलसी कॉलनी) यांनी गळफास घेऊन आत्महत्या करणाऱ्याचे नाव असून सागर कृष्णानी (वय २९, लकडगंज), किशोर धनवानी (वय ४८), रोशन शाहू (वय ४०), दया धनजानी (वय ५६), कुमार वेनसानी (वय ३८), रवींद्र तडस (वय ३९), राहुल डेकाटे (वय ३९), पंकज भावनानी (वय ४३) व आनंद खट्टर (वय ४८),अशी अटकेतील आरोपींची नावे आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार भरत यांचा मुलगा ईश्‍वर याने व्यापारासाठी काही वर्षांपूर्वी कर्ज घेतले होते. ते कर्ज फेडताना त्याला त्रास होत असल्याने त्याने काही दिवसांपासून फोन बंद करू तो कॉल वडील भरत यांच्या मोबाइलवर डायव्हर्ट केला. त्यामुळे व्यापाऱ्यांच्या कर्जाची परतफेड करण्यासाठी येणारे सर्व फोन भरत यांच्या मोबाइलवर यायचे. त्यामुळे त्यांना याबाबत माहिती झाली. त्यांनी मुलाला विचारणा केली असता, त्याने ते कर्ज फेडल्यावरही व्यापाऱ्यांकडून त्रास देण्यात येत असल्याचे सांगितले.

त्यामुळे तणावात येत भरत चुग यांनी शनिवारी साडेबारा वाजताच्या सुमारास गळफास घेऊन आत्महत्या केली. यावेळी त्यांनी मृत्युपूर्वी लिहिलेल्या चिठ्ठीत सर्वांच्या नावांचा उल्लेख केल्याने शांतीनगर पोलिसांनी १८ सुपारी व्यापाऱ्यांच्या विरोधात गुन्हे दाखल करीत, नऊ जणांना अटक केली. त्यांना प्रथम श्रेणी न्याय दंडाधिकारी न्यायालयासमोर सादर करीत, त्यांची २६ जूनपर्यंत पोलिस कोठडी घेण्यात आली आहे. तुफैल, जावेद, आसिफ, आसू, निखिल बारदाना, मुकेश बारदाना, अहमद, इमरान, नवास, हमजा व शुभम हे फरार असून पोलिस त्यांचा शोध घेत आहेत.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.