Nagpur wildlife attacks : नागपूर जिल्ह्यांत आठ महिन्यांत वन्यप्राण्यांच्या हल्ल्यांमध्ये ३७ जण मृत्यू; दोन वाघ पकडले

Nagpur wildlife attacks : नागपूर जिल्ह्यात आठ महिन्यांत वन्यप्राण्यांच्या हल्ल्यात ३७ जणांचा मृत्यू झाला आहे. वाघांच्या हल्ल्यांच्या घटनांमध्ये वाढ होत असल्याने वन विभाग उपाययोजना करत आहे.
Nagpur wildlife attacks
Nagpur wildlife attacks sakal
Updated on

नागपूर : मानव आणि वन्यप्राणी यांच्यातील संघर्ष दिवसेंदिवस वाढत आहे. गडचिरोली, चंद्रपूरपाठोपाठ आता नागपूर जिल्ह्यात वाघाच्या हल्ल्यात जीव घेतल्याच्या घटनेत वाढत होत आहे. मागील आठ महिन्यांत राज्यात ३७ जण मृत्यू वन्यप्राण्यांच्या हल्ल्यात झाले आहेत. त्यात सर्वाधिक २४ मृत्यू वाघाच्या हल्ल्यातील असून, गेल्या वर्षीच्या तुलनेत आकडेवारीत घट झालेली आहे. मागील वर्षी ही आकडेवारी ४१ पेक्षा अधिक होती.

राज्यात वाघांच्या संख्येत वाढ होत असताना त्याचा अधिवास कमी झाला आहे. वन विभागाने संवर्धनासाठी केलेल्या उपाययोजनांमुळे वाघासह इतरही वन्यप्राण्यांच्या संख्येत झपाट्याने वाढ होत आहे. मात्र, विकासकामे, रस्त्याचे रुंदीकरण आणि वाघाचा अधिवास शोधण्यासाठी होणारी भटकंती यामुळे वाघ आणि मानव यांच्यातील संघर्ष वाढलेला आहे. गेल्या आठ महिन्यांत मानवावर हल्ले केलेल्या दोन ते तीन वाघांना पकडण्याचा आदेश प्रधान मुख्य वनसंरक्षक (वन्यजीव) यांनी दिला आहेत. दोन वाघांना पकडण्यास यशही आले आहेत.

नागपूर जिल्ह्यातील झिंझरीया या पेंच प्रकल्पाच्या बफर क्षेत्रातील शेतात काम करणाऱ्या महिलेचा वाघाच्या हल्ल्यात मृत्यू झाला. त्यापाठोपाठ आज ताडोबा- अंधारी व्याघ्र प्रकल्पाच्या मूल बफर क्षेत्रात जंगलात गुराख्यांना जाण्यास मज्जाव केलेला आहे. तरीही गुराखी पाळीव प्राणी चराईसाठी गेला असता त्यावर वाघाचे हल्ला केल्याने त्याचा मृत्यू झाला आहे. विशेष म्हणजे नागपूर जिल्ह्यात काल पुन्हा एका वाघाने एका व्यक्तीवर हल्ला करून जखमी केलेले आहे. वाघाची संख्या वाढत असताना नवीन अधिवास शोधताना बफर व जंगलाच्या शेजारी ते येतात. त्यामुळेही संघर्ष वाढू लागला आहे.

पेंच येथील वाघाला बेशुद्ध करून पकडण्यासाठी वन विभागाचे पथक प्रयत्न करीत आहेत. अद्यापही त्याला यश आलेले नाही. कर्मचारी दिवस-रात्र त्या वाघाचा मागोवा घेत आहे. मनुष्यहानी होऊ नये म्हणूनही प्रयत्न करीत आहेत. गेल्या वर्षी राज्यात आठ महिन्यांत वन्य प्राण्यांच्या हल्ल्यात ४१ जणांनी जीव गमावले होते. यंदा आठ महिन्यांतच ३७ जणांचे जीव गेल्याची उघडकीस आले आहे. नागपूर जिल्ह्यात वाघांच्या हल्ल्यात मृत्यू पावणाऱ्याची संख्या वाढत आहे.

या वन्यप्राणांच्या हल्ल्यात झाले मृत्यू (यावर्षीची आकडेवारी)

  • ३७ आतापर्यंत

  • १० बिबटे

  • २४ वाघ

  • ३ जंगली डुकरे

वन्यप्राण्यांचे हल्ले वाढत आहे हे बरोबर आहे. त्यावर उपाययोजना करण्यासाठी वन विभागाकडून प्रयत्न केले जात आहे. अल्पकालीन उपाय म्हणून घटना घडल्यानंतर तातडीने हल्ला झालेल्यांच्या कुटुंबाला सहकार्य केले जात आहे.

- विवेक खांडेकर, अप्पर प्रधान मुख्य वनसंरक्षक (वन्यजीव)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.