Nagpur Video: नागपुरात काय चाललंय? प्रेयसीला दुचाकीच्या टाकीवर बसवून अश्लील चाळे, धक्कादायक व्हिडीओ समोर...

Nagpur Crime Video: या घटनेमुळे नागपूरातील सार्वजनिक शिस्त आणि नैतिकतेबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. पोलिसांनी या प्रकरणात आरोपींवर कडक कारवाई केली.
Nagpur crime Video
Nagpur crime Videoesakal
Updated on

नागपूर: उपराजधानी नागपूरात दुचाकीवर अश्लील चाळे करणारा आणखी एक व्हिडीओ समोर आला आहे. काही दिवसांपूर्वी असात कारमध्ये अश्लील चाळे करणारा व्हिडीओ व्हायरल झाला होता, त्याचप्रमाणे आता दुचाकीवर तसाच प्रकार करणारा व्हिडीओ सध्या चर्चेत आहे. या घटनांमुळे नागपूरातील सुरक्षा व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून, पोलिसांनी यावर तातडीने उपाययोजना करण्याचे आवाहन नागरिकांकडून केले जात आहे.

या प्रकरणात आरोपीचं नाव हर्ष उर्फ बिल्ली राजेश कहर आहे, जो कुख्यात गुंड म्हणून ओळखला जातो. काही दिवसांपूर्वी तो आपल्या प्रेयसीसोबत दुचाकीच्या पेट्रोल टँकवर बसून अश्लील चाळे करत नागपूरातील सदर पोलीस स्टेशन हद्दीत फिरत होता. या घटनेचा व्हिडीओ काहींनी सोशल मीडियावर टाकला आणि पोलिसांनी त्याचा मार्गावरील सीसीटीव्ही फुटेज तपासून त्याचा शोध घेतला.

अटक आणि गुन्हा दाखल:

बिल्ली एक महिना अगोदरच एका प्रकरणातून कारागृहातून बाहेर आला होता. त्याच्यावर आधीच अनेक गुन्हे दाखल आहेत. सदर पोलिसांनी या प्रकरणात बिल्ली आणि त्याच्या प्रेयसीवर गुन्हा दाखल केला आहे. या प्रकारामुळे नागपूरातील नागरिकांमध्ये तीव्र संताप निर्माण झाला आहे आणि अशा घटनांवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली जात आहे.

Nagpur crime Video
'...म्हणून पुण्याचे पालकमंत्री आल्यावर शरद पवार उठून उभे राहिले'; अजितदादांवर निशाणा साधत काय म्हणाल्या सुप्रिया सुळे?

पूर्वीची घटना:

काही दिवसांपूर्वी धरमपेठ परिसरात एक सीए आणि अभियंता प्रेयसीने कारमध्ये अश्लील चाळे केल्याचा व्हिडीओ व्हायरल झाला होता. या घटनेमुळे नागपूरातील सार्वजनिक शिस्त आणि नैतिकतेबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. पोलिसांनी या प्रकरणातही आरोपींवर कडक कारवाई केली होती.

Nagpur crime Video
Sex Tourism चालवणाऱ्या प्रसिद्ध मॉडेलला अटक! मुलांना वृद्ध महिलांकडे पाठवून चालवायची सेक्स रॅकेट, असा झाला पर्दाफाश

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com