Inflation : दुधावरची तहान ताकावर... वाढत्या महागाईमुळे गृहिणींचा मोर्चा कडधान्याकडे

सध्या पावसामुळे पालेभाज्या सडत आहेत. परिणामतः आवक कमी झाली असून, भाजीपाला चांगलाच भडकला आहे.
tomato
tomato esakal
Updated on

नागपूर : भाजी करायची म्हटले तर गृहिणींचे टोमॅटोविना अजिबात भागत नाही. खरं तर टोमॅटोशिवाय भाजीला चवच येत नाही. मात्र सध्या टोमॅटोला सोन्याचे भाव आल्याने गोरगरिबांच्या आवाक्याबाहेर गेले आहे. यासोबतच भाजीपालाही महागल्याने बहुतांश ग्राहक कडधान्यावर भर देत, दुधावरची तहान ताकावर भागवित असल्याचे चित्र शहरात जागोजागी पाहायला मिळत आहे.

सध्या पावसामुळे पालेभाज्या सडत आहेत. परिणामतः आवक कमी झाली असून, भाजीपाला चांगलाच भडकला आहे. पालक, मिरची, सांबार, वांगे, फुलकोबी, पानकोबी, भेंडी, गवार, चवळीच्या शेंगा, शिमला मिरचीसह जवळपास सर्वच हिरव्या भाज्या महागल्या आहेत. मात्र सर्वाधिक भाव सध्या टोमॅटो खात आहेत. त्याच्या जोडीला अद्रकही भाव खात असून २८० रुपये किलो असा दर आहे.

बाजाराचा फेरफटका मारला असता, टोमॅटो १०० ते १२० रुपये प्रती किलो विकले जात आहेत. एरवी एक किलो खरेदी करणारे ग्राहक आता अर्धा किलोवर, तर अर्धा किलोवाले एका पावावर आले आहेत. आमचूर पावडर व लिंबू पर्याय म्हणून वापरू लागले आहेत.

भाजीपाला आवाक्याबाहेर गेल्याने अनेकांनी आपला मोर्चा चना, तूर, मूग, उडीद, मसूर, कुळीथ, मटकी, बरबटीच्या डाळींसह चवळी, सोयाबीन, वटाणा या कडधान्याकडे वळवला आहे.

tomato
Tur Bajar Bhav : शेतकऱ्यांची भाववाढीची प्रतीक्षा संपली! तुरीला दहा हजार रुपये भाव

आलू, कोहळे व अन्य एक-दोन भाज्यांचा अपवाद वगळता सध्या बहुतांश भाज्या ८० ते १०० रुपये किलोवर गेल्या आहेत. एवढ्या महाग भाज्या खरेदी करण्याची गोरगरिबांची हिंमतच होत नाही. भाजीपाला महाग झाल्यापासून असंख्य ग्राहक मोठ्या प्रमाणावर कडधान्य खरेदी करीत आहेत. पावसाळ्यात पालेभाज्या भडकल्यानंतर दरवर्षीच आम्हाला हा अनुभव येतो.

-सचिन राऊत, किराणा दुकानदार

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.