नागपूर : महागाई दिवसेंदिवस हातपाय पसरवत आहे. किराणासोबत फळे, सिलिंडरचे दर सतत चढेच असल्याने सर्वसामान्यांचे जगणे कठीण झाले आहे. परिणामी, त्यांचे दोन वेळचे जेवणही महागल्याने आता जगायचे कसे असा प्रश्न उभा ठाकला आहे.
अवकाळी पावसामुळे गहू आणि तूर डाळीच्या दरात सतत वाढ होत आहे. गहू आणि तूर डाळीच्या दरात ३० ते ३५ टक्के वाढ झालेली आहे. मागील वर्षी प्रतिक्विंटल २७०० रुपये किलो असलेला गहू यंदा चार हजार तर तूर डाळही ९५ रुपयांवरून १३५ रुपये किलोवर गेली आहे. साखरेच्या दरातही वाढ झालेली आहे.
ज्वारी महागली
अवकाळी पावसामुळे ज्वारीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. त्याचा फटका ज्वारीच्या पिकांना बसला असून त्याचे दरात प्रतिकिलो दहा रुपयांची वाढ झालेली आहे. अजूनही भाव वाढण्याची शक्यता आहे.
अवकाळी पावसाचा पिकांना फटका
पावसामुळे गहू आणि धान या दोन्ही पिकांना मोठा फटका बसला आहे. कळमना ठोक बाजारात मध्यम दर्जाच्या गव्हाचा भाव ३३०० ते ३७०० रुपये प्रतिक्विंटलवर पोहोचला आहे, तो मागील वर्षी २२०० ते २३०० रुपये होता. त्याचबरोबर धानाचे दरही २०० ते २५० रुपयांनी वाढून २६०० ते २८०० रुपये प्रतिक्विंटलवर पोहोचले आहेत. त्यामुळे तांदळाचे भाव भडकले आहेत.
ताटातून वरण झाले गायब
जानेवारी-फेब्रुवारी दरम्यान बाजारात तुरीची विक्रमी आवक होती, परंतु सध्या ती कमी झालेली आहे. बाजारात केवळ दीड हजार ते दोन हजार पोती तूर येत आहे. बाजारात तुरीला ६,५०० ते ७,२०० रुपये भाव आहे. अवेळी आलेल्या पावसामुळे तुरीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याने तूर डाळीचे दरात सतत वाढ होत आहे. सध्या घाऊक बाजारात १२० रुपये प्रतिकिलो तूर डाळ असून किरकोळ बाजारात १३५ ते १४० रुपये किलोवर गेली आहे.
अवेळी आलेल्या पावसामुळे गव्हाला फटका बसला आहे. त्यामुळे चांगल्या गुणवत्तेच्या गव्हाचे दर आकाशाला भिडले आहेत. तर कणिकसाठी वापरण्यात येणाऱ्या गव्हाचे दर त्या तुलनेत कमी आहे. त्यामुळे घरी गहू आणून आटा तयार करणाऱ्यांना यंदा गहू अधिक किमतीत खरेदी करावा लागणार आहे.
त्यातुलनेत कणिक स्वस्त राहण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. ढगाळ वातावरणामुळे अद्यापही गव्हाची हवी तशी आवक सुरू झालेली नाही. चांगल्या प्रतिच्या गव्हाची प्रतीक्षा आहे. मात्र, त्याचे दर काय असेल अद्यापही स्पष्ट सांगणे कठीण आहे. भाव मात्र, गव्हाच्या पिठापेक्षा अधिक राहतील असे संकेत आहेत.
- प्रभाकर देशमुख, किराणा व्यापारी
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.