नागपूर - जवळपास एक दशकपूर्वी आंतरराष्ट्रीय स्पर्धेत पदक जिंकल्यानंतर नागपूरचा दिव्यांग तिरंदाज संदीप गवईने नोकरीसाठी राज्य शासनाकडे रीतसर अर्ज केला; मात्र वारंवार अर्ज व विनंत्या करूनही त्याला सरकारने नोकरी दिली नाही. काल (बुधवारी) यादी जाहीर झाली असून, त्यातही पदरी निराशाच पडली. सातत्याने होत असलेल्या अन्यायामुळे संदीप निराश झाला असून, त्याने शासनाकडे नोकरीसाठी आर्जव केले आहे.