Fake Documents : निराधार योजनेसाठी बोगस प्रमाणपत्रांचा आधार; चौकशीतून धक्कादायक माहिती उघड; मृताच्या नावे कागदपत्रे

संजय गांधी निराधार व श्रावण बाळ योजनेची रक्कम बोगस लाभार्थ्यांच्या बॅंक खात्यात वळती केल्याचे प्रकरण समोर आल्यानंतर आता या योजनेचा लाभ घेण्यासाठी बोगस आधार कार्ड व मृत्यू प्रमाणपत्राचा वापर होत असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.
Investigation reveals shocking information bogus certificates for scheme nagpur
Investigation reveals shocking information bogus certificates for scheme nagpursakal
Updated on

नागपूर : संजय गांधी निराधार व श्रावण बाळ योजनेची रक्कम बोगस लाभार्थ्यांच्या बॅंक खात्यात वळती केल्याचे प्रकरण समोर आल्यानंतर आता या योजनेचा लाभ घेण्यासाठी बोगस आधार कार्ड व मृत्यू प्रमाणपत्राचा वापर होत असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. ५० ते ६० अशी बोगस आधार कार्ड व मृत व्यक्तीच्या नावाची प्रमाणपत्रे जिल्हा प्रशासनाच्या निदर्शनास आले.

घटस्फोटित महिला, परित्यक्ता, वेश्या व्यवसायातून मुक्त महिलांना केंद्र व राज्य शासनाकडून आर्थिक मदत दिली जाते. संजय गांधी निराधार व श्रावण बाळ योजनेंतर्गत ६५ वर्षावरील पात्र महिला लाभार्थ्यांच्या बॅंक खात्यात महिन्याला थेट रक्कम जमा केली जाते.

बोगस लाभार्थ्यांच्या नावे ही रक्कम लाटण्यात येत असल्याचे प्रकार समोर आले आहेत. जिल्ह्यातील दोन महसूल कर्मचारी व काही कंत्राटी कर्मचाऱ्यांनी मिळून लाभार्थ्यांची रक्कम थेट बोगस बॅंक खात्यात वळती केली होती.

Investigation reveals shocking information bogus certificates for scheme nagpur
Nagpur Crime : २२ हजार रुपये उकळत युवतीला ठेवले डांबून; नोकरीच्या नावावर केला मानसिक, शारीरिक छळ

याप्रकरणी दोन कर्मचाऱ्यांवर गुन्हा दाखल झाला होता. विभागीय चौकशीअंती त्यांची वेतनवाढ रोखण्याचे आदेश जिल्हाधि-काऱ्यांनी दिले. आता पुन्हा या योजनेच्या लाभासाठी बोगस कागदपत्रांचा वापर होत आहे.

मिळालेल्या माहितीनुसार बोगस आधार कार्ड व मृत्यू प्रमाणपत्रांच्या आधारे शासनाची फसवणूक केली जात आहे. अशा सुमारे ५० ते ६० बोगस व्यक्ती असल्याचा संशय प्रशासनाला आहे. बोगस आधार कार्ड व मृत्यू प्रमाणपत्रांच्या आधारे तयार केलेले अर्ज दोन आपले सरकार सेवा केंद्रातूनच बनविल्याची माहिती समोर आली आहे.

Investigation reveals shocking information bogus certificates for scheme nagpur
Nagpur Crime : स्वाक्षरीसाठी अपहरण करून मध्यप्रदेशातून आणले नागपुरात; भागीदारांमधील वादातून तिघांवर गुन्हा

त्यामुळे या केंद्रावरील इतरही अर्जांची तपासणी होणार असल्याचे संकेत मिळत आहेत. ही दोन आपले सरकार सेवा केंद्र जिल्हा प्रशासनाच्या रडारवर असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे.

अशी आली अधिकाऱ्यांना शंका

संजय गांधी निराधार योजना विभागातील अधिकाऱ्यांना काही अर्जदारांसंदर्भात शंका आली. त्यामुळे संबंधित अर्जदारांच्या आधार कार्डची सत्यता तपासण्यात आली. त्याचप्रमाणे मृत्यू प्रमाणपत्राची सत्यता मनपाकडून तपासण्यात आली. त्यात संबंधितांची नोंदणीच नसल्याचे समोर आले. त्यांची कागदपत्रे बोगस असल्याचे समोर आले. असे ५० ते ६० बोगस अर्जदार असल्याची प्राथमिक माहिती आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.