नागपूर : नागपूर जिल्ह्यात एमआयडीसी व एक्सएसआयओ वेअरहाऊसिंग प्रा. लि. यांच्या संयुक्त विद्यमाने १हजार २८० कोटी रुपयांच्या गुंतवणुकीच्या सामंजस्य करारावर आज उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत करारावर स्वाक्षरी करण्यात आली.
याद्वारे सुमारे ६ हजार रोजगार प्रत्यक्ष व अप्रत्यक्षरित्या उपलब्ध होणार आहे. यावेळी गृहनिर्माण मंत्री अतुल सावे, महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाचे सह मुख्य अधिकारी अनिल भंडारी, एक्सएसआयओचे व्यवस्थापकीय संचालक आशिष अग्रवाल, डॉ. परिणय फुके, आमदार आशिष जयसवाल यांची उपस्थिती होती.
नागपूर जिल्ह्यात एक्सएसआयओ लॉजिस्टिक्स व औद्योगिक उत्पादन पार्कचा विकास तीन वेगवेगळ्या ठिकाणी करण्यात येणार आहे. एक्सएसआयओ लॉजिस्टिक पार्कमार्फत नागपुरात पहिल्यांदाच थेट परकीय गुंतवणूक करण्यात येत आहे. समृद्धी महामार्गाच्या शेजारी असलेल्या या लॉजिस्टिक पार्कमध्ये यापूर्वी ४०० कोटी रुपयांची गुंतवणूक केली आहे.
त्याठिकाणी सुमारे ४ हजार स्थानिक लोकांसाठी प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष रोजगार उपलब्ध झाला आहे. या पार्कमध्ये नागपूरला भारताची लॉजिस्टिक पार्कची राजधानी बनवण्याची क्षमता आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.