शेतकऱ्यांनो, थांबा... थांबा... आठवडाभर तरी जोरदार पाऊस नाहीच!

शेतकऱ्यांनो, थांबा... थांबा... आठवडाभर तरी जोरदार पाऊस नाहीच!
Updated on

नागपूर : गेल्या आठवड्यात जोरदार मृगधारा बरसल्यानंतर वरुणराजाची विदर्भावर वक्रदृष्टी (no rain in vidarbha) दिसून येत आहे. पावसाने अचानक दडी मारल्याने बळीराजाची चिंता वाढली (Farmers anxiety increased) असून, दुबार पेरणीचे सावट (Double sowing) निर्माण झाले आहे. सध्या जोरदार वादळी पावसासाठी अनुकूल वातावरण नसल्यामुळे विदर्भात किमान आठवडाभर जोराचा पाऊस पडणार नाही. प्रादेशिक हवामान विभागाने तसे संकेत (Indications of the Regional Meteorological Department) दिले आहेत. दरम्यान, उपराजधानीत मंगळवारी दुपारी काही भागात पावसाने हजेरी लावली. (It-hasn't-rained-for-a-week-in-vidarbha)

हवामान विभागाचे संचालक मोहनलाल साहू यांनी दिलेल्या माहितीनुसार, मॉन्सून उत्तर भारताच्या दिशेने सरकला आहे. त्यामुळे विदर्भात सध्या तरी धो-धो पावसाची शक्यता कमीच आहे. मुसळधार पावसासाठी लागणारी सिस्टीम किंवा कमी दाबाचा पट्टा बंगालच्या उपसागरात बनल्यानंतरच विदर्भात जोरदार पाऊस येतो. सध्या अशी कोणतीही अनुकूल स्थिती नाही.

शेतकऱ्यांनो, थांबा... थांबा... आठवडाभर तरी जोरदार पाऊस नाहीच!
शहीद भूषण सतई यांच्या वडिलांची गळफास लावून आत्महत्या

तथापि ‘लोकल डेव्हलपमेंट’मुळे काही जिल्ह्यांत बुधवारी व गुरुवारी हलका ते मध्यम स्वरुपाचा पाऊस पडेल, असे ते म्हणाले. मंगळवारी दुपारनंतर शहरावर ढगाळ वातावरण होते. मात्र, मोजक्याच भागांत हलका शिडकावा झाला. दोन-तीन दिवसांपासून सूर्य तापू लागल्याने कमाल व किमान तापमानात वाढ झाली आहे. वातावरणात दमटपणा वाढल्याने अस्वस्थ व चिडचिडेपणा वाढला आहे. त्यामुळे गेल्या आठवड्यात पावसामुळे थांबलेले पंखे व कुलर पुन्हा गरगरायला लागले आहेत.

शेतकऱ्यांनो, थांबा... थांबा... आठवडाभर तरी जोरदार पाऊस नाहीच!
नागपुरातील वाकी येथे चौघांना जलसमाधी; पोहण्याचा मोह बेतला जिवावर

शेतकरी चिंतेत

सुरुवातीच्या दमदार पावसानंतर अनेक शेतकऱ्यांनी लगबगीने पेरण्या आटोपल्या. मात्र, आता त्यांच्यावर आकाशाकडे पाहण्याची वेळ आली आहे. येत्या एक-दोन दिवसांत पाऊस न आल्यास अनेकांवर दुबार पेरणीची वेळ येणार आहे. सोमवारपासून सुरू झालेल्या आर्द्रा नक्षत्रात त्यांना समाधानकारक पावसाची अपेक्षा आहे.

(It-hasn't-rained-for-a-week-in-vidarbha)

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()