नागपूर - कळमना ठाण्याच्या जुनी कामठी मार्गावरील पोलिस चौकीमध्ये पोलिसांकडून सिगारेट ओढणे आणि जुगार खेळणाच्या व्हिडिओ व्हायरल होताच, परिमंडळ पोलिस उपायुक्त निकेतन कदम यांनी दोघांना तडकाफडकी निलंबित केले. दरम्यान या प्रकरणाची चौकशी सहायक पोलिस आयुक्त विशाल क्षीरसागर यांच्यामार्फत करण्याचे आदेशही काढले आहे.