मेकअप आर्टिस्ट कल्याणीचा प्रवास गावापासून बॉलिवूडपर्यंत

मेकअप आर्टिस्ट कल्याणीचा प्रवास गावापासून बॉलिवूडपर्यंत
Updated on

कन्हान (जि. नागपूर) : वडील सोमाजी सरोदे यांची मुलगी इंटरनॅशनल मेकअप आर्टिस्ट कल्याणी सरोदे ही पाच मुलींमध्ये सर्वांत धाकटी मुलगी. तिचे दहावीपर्यंतचे शिक्षण धर्मराज विद्यालय कन्हान येथे झाले. त्यांच्या चार मुलींपैकी कल्याणी हिने बॉलिवूडमध्ये इंटरनॅशनल मेकअप आर्टिस्ट म्हणून नावलौकिक केला आहे.

सोमाजी सरोदे यांनी चारही मुलीला जमेल तसे उच्चशिक्षित करून स्वतःच्या पायावर उभे केले. सर्वांचे लग्न करून त्यांना त्यांच्या संसारात हातभार लावण्यासाठी सक्षम केले. कल्याणी हिला देखील पुढे अभियांत्रिकी शिक्षण घेण्यासाठी नागपूर शहरात पाठवले. कल्याणी अभियंता झाली. त्यानंतर तिने आयटी क्षेत्रात तीन महिने ‘जॉब’ केला. यातच तिला रुची नसल्याने स्वतःचे काही करण्याचे मनात आल्याने अहमदाबादमध्ये दहा दिवसाचे प्रशिक्षण घेतले. याआधी तिने नागपूर शहरात शिक्षण घेत असताना ब्युटी पार्लरचा कोर्स केला होता. त्यामुळे तिला ‘मेकअप आर्टिस्ट’ म्हणून आत्मविश्वास निर्माण झाला.

मेकअप आर्टिस्ट कल्याणीचा प्रवास गावापासून बॉलिवूडपर्यंत
नक्षलग्रस्त भागांत आता फुलणार हिरवागार भाजीपाला

यातच २०१९ मध्ये ओडीसा येथे तिचे ‘नॉमिनेशन’ झाले. यात तिला नॅशनल अवॉर्ड मिळाला. २०१९ मध्ये नागपूर येथे कॉम्पिटेशन झाले. यात चाळीस जणींमधून बॉलिवूड मेकअप आर्टिस्ट प्रथम पारितोषिक रूबी शेख यांच्या हस्ते कल्याणीला देण्यात आले. याचप्रंसगी रोकडे ज्वेलर्स यांनी घेतलेल्या ‘मॉडिलिंग शो’ मध्ये सुध्दा प्रथम पारितोषिक पटकाविण्याचा मान मिळाला.

साउथ खिलाडी मूव्हीमधला सुपरस्टार रवी शंकर तर क्राईम पेट्रोल धारावाहिकामधील विकास महाजन यांचा मेकअप करण्यासाठी तिला बोलाविण्यात आले होते. कल्याणी सरोदे यांच्या हातून काही सामाजिक कार्यसुद्दा घडत असताना तेली समाजात कामाचे अध्ययन करीत नागपूर जिल्हा परिषद महिला आघाडीच्या उपाध्यक्ष पदावर तिची निवड करण्यात आली.

२०२० मध्ये नागपूर येथे ‘बेस्ट मेकअप आर्टिस्ट’ पुरस्कार करिश्मा तन्ना ( खतरो के खिलाडी विनर) यांच्या हस्ते तिला बहाल करण्यात आला. मराठी कलाकार प्रार्थना बेहरे यांच्या हस्ते नाशिक जिल्ह्यात ‘बेस्ट मेकअप आर्टिस्ट २०२१ अवार्ड’ देण्यात झाला. इंटरनॅशनल आयकॉनिक अवॉर्ड २०२१पहिला इंटरनॅशनल अवॉर्ड सहारा स्टार हॉटेल मुंबई येथे जासमीन भसीन ( बिग बॉस फेम) यांच्या हस्ते देण्यात आला.

प्रवास गावापासून तर बॉलिवूडपर्यंत

कल्याणी सरोदे हिच्या जीवनातील महत्त्वपूर्ण दुसरा इंटरनॅशनल ग्लोरी अवार्ड (बॉलिवूड सेलीब्रीटी मेकअप आर्टिस्ट अवार्ड २०२१) २८ ऑगस्ट २०२१ रोजी बॉलिवूड सुपरस्टार सोनू सुद यांच्या हस्ते गोवा राज्यात देण्यात आला. तिचा आतापर्यंतचा प्रवास गावापासून तर बॉलिवूडपर्यंत असा आहे. हा एक सुखद अनुभव असल्याचे कल्याणी आणि तिच्या कुटुंबातील सदस्यांचे मत आहे.

मेकअप आर्टिस्ट कल्याणीचा प्रवास गावापासून बॉलिवूडपर्यंत
हे भाजप-सेना युतीचे संकेत; युतीचे सरकार लवकरच
कल्याणी सरोदे या मुलीने गावाचे नाव पुढे आणले आहे. भविष्यातसुध्दा अशी प्रगती करून आई-वडिलांचे, समाजाचे नाव उंचावून गावातील मुलीसमोर आदर्श निर्माण करावा. कोरोनाच्या काळात मोठे कार्यक्रम घेता येत नसल्याने आम्ही सत्कार घेतला नाही. परिस्थिती सामान्य झाली की गावाच्या वतीने सत्कार कार्यक्रम घेण्यात येईल.
- बळवंत पडोळे, सरपंच, कांद्री-कन्हान

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.