Chandrayaan 3 Mission : भारताच्या महत्वांकाक्षी असलेले चांद्रयान-३ चंद्रावर उतरण्यास सज्ज आहे. चांद्रयानच्या निर्मितीत बुलडाणा जिल्ह्यातील खामगाव एमआयडीसीतील विकमशी फॅब्रिक्सचेही महत्वपूर्ण योगदान राहिले आहे. बुलडाणा जिल्हावासीयांसाठी ही गौरवाची बाब ठरली आहे.
श्रीहरिकोटा येथील सतीश धवन अंतराळ केंद्रावरुन चांद्रयान ३ हे २.३५ मिनिटांनी अवकाशात लॉन्च करण्यात आले होते. एलएमव्ही.३ या रॉकेटचा वापर करुन हे यान लाँच करण्यात आले होते. हे यान आज २३ ऑगस्ट रोजी चंद्रावर उतरणार आहे.
भारताच्या या महत्वांकाक्षी मोहिमेकडे देशवासीयांचेच नव्हेतर संपूर्ण जगभराचे लक्ष लागले होते. या मोहिमेत बुलडाणा जिल्हयातील खामगाव एमआयडीसीतील विकमशी फॅब्रिक्स प्रा. लि. मध्ये निर्माण झालेल्या थर्मल शिल्डचा वापर चांद्रयानमध्ये करण्यात आला आहे. विकमशी फॅब्रिक्सने याआधीसुद्धा मिग २१ फायटर प्लेनसाठी ताडपत्री तयार केली होती.
विकमशी फॅब्रिक्सने भारतीय संरक्षण विभागाला पुरवून देशकार्यात सहभाग नोंदवल्या बद्दल समाधान व्यक्त केले आहे. १९८७ मध्ये सुद्धा मिग विमानासाठी ताडपत्रीचे उत्पादन करून तर १९९० मध्ये सर्जीकल आणि रबरशिटच्या उत्पादनाच्या माध्यमातून विकमशी उद्योग समूहाने योगदान दिले होते.
त्याचवेळी अग्निबाणाच्या उष्णतेपासून उपग्रह सुरक्षित ठेवण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या पातळ फॅब्रिकचीही निर्मिती यापूर्वी केली होती. याशिवाय जीएसएलव्ही मार्क 03 अग्नीबाणाच्या सहाय्याने ३.१३ टन वजनाच्या जी सट १९ उपग्रहासाठी पातळ फॅब्रिक्स तयार करण्यात आले होते. एकंदरीत विकमशी उद्योग समूहाने वेळोवेळी आपले योगदान दिले आहे. (latest marathgi news)
‘चांद्रयान’साठी खारीचा वाटा आमचे भाग्य
भारतीय संरक्षण क्षेत्रात लागणा-या विविध उत्पादन पुरवठयाच्या माध्यमातन इसरोच्या कामगिरीत आम्ही खारीचा वाटा उचलला याचे समाधान आहे. आता चांद्रयान ३ मध्ये आमच्या कंपनीत निर्मित थर्मल शिल्ड प्रोडेक्टचा वापर करण्यात आला आहे. यापूर्वी चांद्रयान ०१ व ०२ मध्येही आमच्या येथे बनवण्यात आलेल्या थर्मल शिल्डचा वापर करण्यात आला होता. देशाच्या स्वप्नपूर्तीत विकमशी परिवाराचे योगदान राहिले याचे समाधान आहे.
- गितिका विकमशी, संचालक, विकमशी फॅब्रिक्स, खामगाव जि. बुलडाणा.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.