Soybean Rate : बियाण्यांसाठी सोयाबीनच्या खरेदीने बाजार गरम

भाव अजूनही दबावातच : पिवळ्या सोन्याची आवक वाढली
kharif crop soybean arrive in market soybean rate farmer agriculture amravati
kharif crop soybean arrive in market soybean rate farmer agriculture amravatiSakal
Updated on

अमरावती : यावर्षीच्या खरीप हंगामातील पहिल्या नगदी सोयाबीन पिकाची बाजारातील आवक वाढली आहे. बियाण्यांसाठी खरेदीदार बाजारात उतरल्याने भाव पाच हजारावर गेले असून प्लॅण्टसाठी खरेदी होत असलेल्या सोयाबीनला मात्र हमीदराच्या तुलनेत कमी दर मिळत आहेत.

बुधवारी येथील बाजार समितीत सोयाबीनला ४,३५० ते ४,५२१ रुपये दर मिळाला व २२ हजार ८१४ पोत्यांची आवक नोंदविल्या गेली. शेतकऱ्यांना खरीप हंगामात पैसे मिळवून देणारे सोयाबीन आता बाजारात आले आहे. पावसाने उघडीप दिल्याने कापणी जोरावर आहे. वाळलेला सोयाबीन बाजारात येत असला तरी त्यामध्ये ८ ते १२ टक्केच्या जवळपास आद्रता असल्याचे खरेदीदारांनी म्हटले आहे.

शेतकऱ्यांच्या या पिवळ्या सोन्यास अद्यापही हमीदरापेक्षा अधिक भाव मिळालेला नसून भाव दबावातच आहेत. हंगामाच्या प्रारंभी बियाण्यांसाठी लागणाऱ्या सोयाबीनची खरेदी अधिक होत असून भावही पाच हजारावर मिळत आहे. तर प्लॅण्टसाठी खरेदी होत असलेल्या सोयाबीनला मात्र हमीदरापेक्षाही कमी भाव आहेत.

बुधवारी येथील बाजार समितीत २२ हजार ८१४ पोत्यांची आवक झाली आहे. खरेदीदारांनी या सोयाबीनला ४३५० ते ४५२१ दर दिला. तर, दसऱ्यापूर्वी सोमवारी (ता.२३) आलेल्या सोयाबीनला ४,४५० ते ४,६७७ रुपये दर होता. बियाण्यासाठीच्या सोयाबीनला ४,८०० ते ५,१०० रुपये दर खरेदीदारांनी दिला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.