Crime News : खून करून मृतहेद पुरला जंगलात; मोबाईलमुळे फुटले आरोपींचे बिंग

सध्या मोबाईल आणि विविध दूरचित्रवाहिनीवर गुन्हेगारी संदर्भात अनेक मालिका सुरू आहे. बरेच आरोपी या मालिकांमधील कटकारस्थान पाहून तसाच प्रकार करण्याचा प्रयत्न करतात.
crime news
crime news esakal
Updated on
Summary

सध्या मोबाईल आणि विविध दूरचित्रवाहिनीवर गुन्हेगारी संदर्भात अनेक मालिका सुरू आहे. बरेच आरोपी या मालिकांमधील कटकारस्थान पाहून तसाच प्रकार करण्याचा प्रयत्न करतात. अशीच घटना सावेनर तालुक्यात घडली.

सावनेर - कोराडी येथील एका व्यक्तीला खंडणीसाठी जडीबुटीच्या बहाण्याने सावनेर येथील लॉजमध्ये बोलावले. त्यानंतर त्याला बळजबरीने चार चाकी वाहनात बसवून काटोल तालुक्यातील गंगाळडोह येथील शिवारात निर्जनस्थळी नेऊन त्याचे अपहरण केले.

त्याला मारझोड करून खून केला. आणि याच ठिकाणी खड्डा करून मृतदेह पुरला होता. परंतु अखेर पोलिसांनी या प्रकरणाचा उलगडा केला. या प्रकरणातील तीन आरोपींना पोलिसांनी अटक केली असून इतर तिघांचा शोध घेत आहेत.

सध्या मोबाईल आणि विविध दूरचित्रवाहिनीवर गुन्हेगारी संदर्भात अनेक मालिका सुरू आहे. बरेच आरोपी या मालिकांमधील कटकारस्थान पाहून तसाच प्रकार करण्याचा प्रयत्न करतात.

अशीच घटना सावेनर तालुक्यात घडली. खंडणी वसुल करण्यासाठी जडीबुटीचा व्यवसाय करणाऱ्या एका व्यक्तीला लॉजमध्ये बोलावून व त्याचे अपहरण करून खून करण्यात येते.

यावर आरोपी थांबत नाहीतर थंड रक्ताने ते त्याचा मृतदेह जमिनीत पुरून काही न झाल्याचा आव आणतात. मात्र, मोबाईलसारख्या यंत्राने खून करणाऱ्यांचे धागेदोरे जुळविले आणि खूनाचा तपास लागला. काटोल तालुक्यातील वाई आणि सध्या कोराडी मुक्कामी दिलीप चंदन ढेरावन गेल्या काही दिवसांपासून बेपत्ता होता.

रितेश इंगोले याने सावनेर पोलिसात

तक्रार नोंदविली होती. दिलीप बेपत्ता झाला म्हणून कुटुंबीय चिंतेत होते. तक्रार झाल्यानंतर पोलिसांनी तपास सुरू केला. त्यांनी तक्रार करणाऱ्या व्यक्तीलाच संशयात पकडले. त्याच्या मोबाईलमधील डेटा आणि संभाषण तपासले.

यातून काटोल येथील केवल सुखदेव कोठे याला पोलिसांनी ताब्यात घेतले. त्याला पोलिसी हिसका दाखविल्यानंतर तो पोपटासारखा बोलू लागला.

दिलीप ढेरावन हल्ली मुक्काम कोराडी याला जडीबुटी घेतो म्हणून सावेनरातील लॉजमध्ये बोलावले. तेथून त्याचे अपहरण करण्यात आले. खंडणी वसूल करण्यासाठी हे कृत्य केल्याची कबुली आरोपींनी दिली.

केवल सुखदेव कोठे ( २५) रा. काटोल, अजय पंजाबगिर सोंलकी रा. वाई तालुका काटोल, रितेश मधुकरराव इंगोले रा.सावनेर, सूरज विजयसिंह बैस (ठाकूर) रा. काटोल, सचिन अशोकराव दहाड रा. साळवी, तालुका काटोल, अब्दुल मंजमील अब्दुलईम खान रा. काटोल यांनी कट रचून संगनमताने दिलीप चंदन ढेरावन याला काटोल तालुक्यातील कोढाळीजवळ आणले.

त्याला मारहाण केली. थंडरक्ताने त्याचा खून करून आरोपींनी दिलीप याचा मृतदेह जमिनी पुरला. मात्र, मोबाईलमुळे आरोपीचे बिंग फुटले. तपास करून आरोपींना पोलिसांना अटक केली. तीन आरोपी फरार असून त्याचा शोध सुरू आहे.

आरोपींनी मृताची हिरो कंपनीची दुचाकी विहिरीमध्ये टाकून विल्हेवाट लावली. ती दुचाकी विहिरीतून बाहेर काढून जप्त केली. या गुन्ह्यात तीन आरोपीला अटक केली.

तर तीन आरोपीचा शोध सुरू आहे. पोलिस निरीक्षक मारुती मुळुक, सहाय्यक पोलिस निरीक्षक शिवाजी नागवे, पोलिस उपनिरीक्षक व्यंकटेश दोनोडे, पोलिस कर्मचारी पुष्पपाल आकरे, अतुल कुडनकर, राजेश हावरे, सुरेंद्र वासनिक, प्रकाश ठोके, नीलेश तायडे तपास करीत आहेत.

बेपत्ताची तक्रार करणारा निघाला खुनी

दिलीप ढेरावन ही व्यक्ती बेपत्ता असल्याची तक्रार रितेश मधुकरराव इंगोले यांनी पोलिसात दिली. यातून आपल्यावर संशय येणार असे त्याला वाटले. मात्र झाले उलट.

त्यांच्या मोबाईलचे विश्लेषण केल्यानंतर रितेश हाच खुनात सहभागी असल्याचे दिसून आले. पोलिसांनी त्याला आणि त्याच्या सहकाऱ्यांनी अटक केली आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()