Knife attack
Knife attackKnife attack

शेजारी महिलेने धरला अबोला; रागाच्या भरात इसमाने केला चाकू हल्ला

चाकूने तिच्या पोटावर, मानेवर, कमरेवर व हातावर सपासप वार केले
Published on

भिवापूर (जि. नागपूर) : शेजारीन बोलत नसल्याचा राग मनात धरून नराधमाने ती घरी एकटीच असल्याची संधी साधत चाकूने हल्ला (Knife attack) चढविला. यात महिला गंभीर जखमी झाली. तिच्यावर नागपूर येथे उपचार सुरू आहेत. ही घटना रविवारी सकाळी अकरा वाजताच्या सुमारास दिघोरा वस्तीत घडली. पौर्णिमा कुंभकरण सतीबावने (वय ३७) असे जखमी महिलेचे नाव आहे. भारत अंडेलकर (वय ५०) असे आरोपीचे नाव आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, भारतच्या घराशेजारीच पौर्णिमाचे घर आहे. त्याची पूर्वीपासूनच तिच्यावर वाईट नजर होती. ही बाब माहिती असल्याने ती बोलणे टाळायची. हे भारतला खटकत होते. पती सकाळी कामावर गेल्याने ती एकटीच घरी होती. ही संधी साधत आरी मागण्याच्या बहाण्याने भारत तिच्या घरी गेला. महिला आरी आणायसाठी घरात गेली असता भारत तिच्या मागोमाग घरात गेला.

Knife attack
भीषण अपघातात अख्ख कुटुंब ठार; कारचा टायर फुटल्याने घडला अनर्थ

‘माझ्यासोबत बोलत का नाही’ असे म्हणत चाकूने तिच्या पोटावर, मानेवर, कमरेवर व हातावर सपासप वार केले (Knife attack) आणि पळून गेला. हल्ल्यात महिला गंभीर जखमी झाली. याही अवस्थेत ती कशीबशी घराबाहेर पडली. घरापासून काही अंतरावर मजुरीने कामाला असलेल्या पतीला घटनेची माहिती दिली. त्याने वस्तीतील नागरिकांच्या मदतीने तिला ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. प्राथमिक उपचारानंतर तिला नागपूरला हलविण्यात आले. अतिरक्तस्त्राव झाल्याने तिची प्रकृती चिंताजनक असल्याचे समजते.

आरोपीविरुद्ध गुन्हा

माहिती मिळताच ठाणेदार महेश भोरटेकर यांनी घटनास्थळी धाव घेऊन आरोपीचा शोध घेतला (Accused absconded), मात्र तो मिळाला नाही. उपविभागीय पोलिस अधिकारी भीमराव टेळे यांनी भिवापूर पोलिस ठाण्याला भेट देऊन घटनेची माहिती घेतली. पिडितेच्या तक्रारीवरून आरोपीविरुद्ध गुन्हा नोंदविण्यात आला. पोलिस उपनिरीक्षक प्रकाश चंगोले पुढील तपास करीत आहेत.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()