Koradi Pollution: कोराडी प्रदूषणासाठी गुन्हे दाखल करण्याचा इशारा! उच्च न्यायालयाचे महाजेनकोवर एफडीजी यंत्रणेवरून ताशेरे

कोराडी औष्णिक वीजनिर्मिती केंद्रामुळे होणारे प्रदूषण रोखण्यासाठी लावण्यात येणाऱ्या फ्लू गॅस डिसल्फरायजर (एफजीडी) यंत्रणा बसविण्यावरून समाधानकारक उत्तर देऊ न शकल्याने मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने महाजेनकोवर ताशेरे ओढले आहेत.
Koradi Pollution: कोराडी प्रदूषणासाठी गुन्हे दाखल करण्याचा इशारा! उच्च न्यायालयाचे महाजेनकोवर एफडीजी यंत्रणेवरून ताशेरे
Updated on

Nagpur Mahagenco Koradi Pollution: कोराडी औष्णिक वीजनिर्मिती केंद्रामुळे होणारे प्रदूषण रोखण्यासाठी लावण्यात येणाऱ्या फ्लू गॅस डिसल्फरायजर (एफजीडी) यंत्रणा बसविण्यावरून समाधानकारक उत्तर देऊ न शकल्याने मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने महाजेनकोवर ताशेरे ओढले आहेत. तसेच प्रदूषण नियंत्रण कायद्याच्या अंतर्गत संबंधितांवर गुन्हे दाखल करण्याचा मौखिक इशाराही न्यायालयाने दिला आहे. ही यंत्रणा बसविण्याबाबत सद्य:स्थितीचा अहवाल एका आठवड्यांमध्ये सादर करण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत.

विदर्भातील ऊर्जा प्रकल्पांमुळे वाढणाऱ्या प्रदूषणाच्या प्रश्‍नावर ‘विदर्भ कनेक्ट’तर्फे जनहित याचिका दाखल करण्यात आली आहे आहे. न्यायमूर्ती नितीन सांबरे आणि न्यायमूर्ती अभय मंत्री यांच्या समक्ष या प्रकरणावर आज, बुधवारी सुनावणी झाली. कोराडीमध्ये वीजनिर्मिती प्रकल्प सुरू करताना २०१० मध्येच एफजीडी यंत्रणा लावण्याची अट टाकण्यात आली होती. मात्र, तेरा वर्षे उलटल्यावरही ही यंत्रणा लावण्यात आलेली नाही.

मागील सुनावणीत महाजेनकोतर्फे यंत्र लावण्यासाठी नोव्हेंबर महिन्यात कार्यादेश काढला असल्याची माहिती दिली गेली होती. आज एफडीजी यंत्र बसविण्याबाबतचा प्रगती अहवाल एका आठवड्यात सादर करण्याचे आदेश महाजेनकोला न्यायालयाने दिले आहेत. याचिकाकर्त्यांतर्फे ॲड. तुषार मंडलेकर यांनी तर महाजेनकोतर्फे ज्येष्ठ विधिज्ञ सावंत यांनी बाजू मांडली.

महाजेनकोकडून धूळफेक : न्यायालय

आज न्यायालयाने कार्याच्या प्रगतीबाबत महाजेनकोकडे विचारणा केली. त्यावर कोराडी येथील युनिट क्रमांक आठ, नऊ आणि दहा येथे एफजीडी यंत्र लावण्यासाठी एक हजार ३४५ कोटी रुपयाचे कार्यादेश काढले असल्याची माहिती महाजेनकोने दिली. तसेच २६ ते ३० महिन्याच्या कालावधीत काम पूर्ण होणार असल्याचे नमूद केले. मात्र, न्यायालयाचे यावर समाधान झाले नाही. तुम्ही मागील अनेक वर्षांपासून केवळ धूळफेक करत असल्याची टिपणी न्यायालयाने केली. यंत्र बसविण्याबाबत झालेल्या कराराची प्रत कुठे आहे? एफडीजी यंत्राची खरेदी करण्याची तारीख काय? असे विविध प्रश्न न्यायालयाने उपस्थित केले.

Koradi Pollution: कोराडी प्रदूषणासाठी गुन्हे दाखल करण्याचा इशारा! उच्च न्यायालयाचे महाजेनकोवर एफडीजी यंत्रणेवरून ताशेरे
Salman Khan: शब्द पाळला! कॅन्सरग्रस्त जगनबीरला भाईजाननं दिलं सरप्राईज, व्हिडीओ व्हायरल

वायू प्रदूषण मोजा

कोराडी वीज प्रकल्पाच्या परिसरात सध्या प्रदूषणाची स्थिती काय आहे, अशी विचारणा करीत अहवाल सादर करण्याचे आदेश उच्च न्यायालयाने प्रदूषण नियंत्रण मंडळाला दिले. एका आठवड्यात न्यायालयासमोर ही माहिती सादर करायची आहे. प्रदूषण हा जनहिताचा प्रश्न असून यावर तत्काळ उपाययोजना करण्याची गरज असल्याचे मतही न्यायालयाने व्यक्त केले.

Koradi Pollution: कोराडी प्रदूषणासाठी गुन्हे दाखल करण्याचा इशारा! उच्च न्यायालयाचे महाजेनकोवर एफडीजी यंत्रणेवरून ताशेरे
Shahjahanpur Road Accident: गंगेत स्नान करण्यासाठी जाताना काळाचा घाला; ट्रकच्या भीषण धडकेत १२ भाविकांचा मृत्यू

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.