नागपूर : गेल्या वीस वर्षांपासून पूर्व नागपुरात कृष्णा खोपडे कमळ फुलवीत आहेत. विकास कामाचा धडाका आणि नियोजनबद्ध प्रचार यासमोर कॉंग्रेसनंतर आता राष्ट्रवादी कॉंग्रेसही (शरद पवार) हलबल झाल्याचे दिसून आले. त्यातूनच खोपडे यांनी १ लाख ६३ हजार ३९० मते मिळवीत राष्ट्रवादी काँग्रेसच्या (शरद पवार) पेठेचा जवळपास १ लाख १५ हजार २८८ इतक्या मताधिक्याने दारुण पराभव केला.