Lalit Patil Drugs Case: ड्रग तस्करांशी हातमिळवणी करणाऱ्या पोलिसांवर काय होणार कारवाई ? फडणवीस यांची विधानपरिषदेत माहिती

Winter Session: ललित पाटील ड्रग्ज प्रकऱणात तस्करांना मदत करणाऱ्या पोलिसांवर काय कारवाई केली जाणार, याबद्दल महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस विधानपरिषदेत स्पष्टीकरण दिले.
Lalit Patil Drugs Case: ड्रग तस्करांशी हातमिळवणी करणाऱ्या पोलिसांवर काय होणार कारवाई ? फडणवीस यांची विधानपरिषदेत माहिती
Updated on

Maharashtra Assembly Winter Session: राज्यात पोलिस विभागाची ड्रग्जविरोधात लढाई सुरूच आहे. परंतु जर कुणी या ड्रग्ज तस्कर व विक्री करणाऱ्या आरोपींसोबत हातमिळवणी केली तर कलम ३११ अंतर्गत त्या पोलिसांना थेट सेवेतूनच बडतर्फ करण्यात येईल, अशी घोषणा राज्याचे उपमुख्यमंत्री तसेच गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज विधानपरिषदेत केली.


राज्यामध्ये अमली पदार्थांच्या तस्करी आणि विक्रीचे प्रमाण वाढत आहे. ही चिंताजनक बाब असून हा विषय शुक्रवारी (ता.८) विधानपरिषदेत आमदार अनिकेत तटकरे यांनी लक्षवेधीच्या माध्यमातून उपस्थित केला. यावर उत्तर देताना राज्याचे गृहमंत्री फडणवीस यांनी उत्तर दिले. सदस्य तटकरे यांनी रायगड जिल्ह्यातील खोपोलीत ७० ते ८० किलो एमडी पावडर जप्त झाल्याची बाब सभागृहासमोर उपस्थित केली. त्यावर बोलताना फडणवीस यांनी राज्य शासनाची भूमिका मांडली.

फडणवीस म्हणाले, राज्यात पोलिस विभागातर्फे अत्यंत महत्त्वाची लढाई ड्रग्ज विरोधात सूरू केली असून ही लढाई दीर्घकाळ चालविण्यात येणार आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी काही दिवसांपूर्वीच देशभरातील सर्व राज्यांतील गृहमंत्र्यांची व पोलिस महासंचालकांची बैठक घेतली होती. यात ड्रग्जतस्करीचे नेटवर्क मोडून काढण्याबाबत सखोल चर्चा झाली.

तसे निर्देश राज्यातील सर्व अधिकाऱ्यांनी देण्यात आले आहेत. काही प्रकरणांमध्ये बंद कारखान्यांमध्ये अमली पदार्थ तयार करण्यात येत असल्याची बाब निदर्शनास आली. त्यामुळेच विशेषतः पुणे, नाशिक, रायगड, संभाजीनगर या ठिकाणच्या बंद कारखान्यांत हालचाल आढळल्यास तेथे थेट छापे टाकण्याची कारवाई करण्यात येत आहे. (Latest Marathi News)

Lalit Patil Drugs Case: ड्रग तस्करांशी हातमिळवणी करणाऱ्या पोलिसांवर काय होणार कारवाई ? फडणवीस यांची विधानपरिषदेत माहिती
Panchayat Season 3 First Look: सचिव - प्रधान पुन्हा भेटीला! 'पंचायत 3' चा फर्स्ट लूक रिलीज! कधी येतेय भेटीला?

अनेकदा बाहेरील राज्यातील पोलिसांकडून महाराष्ट्रामध्ये कारवाई करण्यात येते. त्यांना मिळालेल्या ‘इंटेलिजन्स’च्या आधारावर ती कारवाई होते. बहुतांश प्रकरणात त्याची स्थानिक पोलिसांना पूर्वकल्पना देण्यात येते, असे उत्तरही त्यांनी विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांच्या प्रश्नाला दिले.(Latest Marathi News)

Lalit Patil Drugs Case: ड्रग तस्करांशी हातमिळवणी करणाऱ्या पोलिसांवर काय होणार कारवाई ? फडणवीस यांची विधानपरिषदेत माहिती
Accident News: मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे वर एकाच दिवशी दोन भीषण अपघात; २ जणांचा मृत्यू, ११ जण जखमी

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()