नागपूर : विधान परिषदेची निवडणूक (Legislative Council elections) जिंकण्यासाठी एक एक मत महत्त्वाचे असताना दोन मतदारांनी मतपत्रिका कोरी (ballot papers of both of them are empty) टाकून सेफ गेम खेळला. त्यामुळे हे बहाद्दार भाजपचे (BJP) की काँग्रेसचे (Congress) असा प्रश्न उपस्थित झाला आहे.
निवडणुकीत ५५९ मतदार निश्चित झाले होते. १० डिसेंबरला झालेल्या मतदानाच्या वेळी ५५४ मतदारांना मतदानाचा हक्क बजावला. तर ५ मतदारांना मतदानच केले नाही. मंगळवारी मतमोजणीतून ते उघड झाले. मोजणीच्या वेळी ५ मत अवैध ठरली. या निवडणुकीत पसंतीक्रम असल्याने मतपत्रिकेवर मतदान करावे लागले. इतर निवडणुकीप्रमाणे ईव्हीएम नव्हते.
मतदारांना सर्व उमेदवारांना मत देण्याचा अधिकार होता. परंतु, हे मत पसंतीक्रमानुसार देणे आवश्यक होते. उमेदवारासमोर १ क्रमांक लिहिल्यावर ते ग्राह्य धरण्यात येणार होते. त्यानंतर इतर उमेदवारांना क्रमानुसार मत देता येते. मतमोजणीतील अनेक गंमती जमती समोर आल्या. मिळालेल्या माहितीनुसार २ मतदारांनी मतपत्रिका कोरीच ठेवली. कोणत्याही उमेदवारांना मत दिले नाही. तर १ मतदाराने तिन्ही उमेदवारांना क्रमाक १ चे मत दिले. एका मतदाराने मतपत्रिकेच्या मागील बाजूने क्रमांक १ लिहिला. तर एका मतदाराने योग्यरीत्या क्रमांक दिला नाही. त्यामुळे या सर्व पाचही मतदारांचे मत अवैध ठरविण्यात आले.
असा ठरला २७५ या विजयी आकडा
५५९ मतदारांपैकी ५५४ मतदारांना मतदानाचा हक्क बजावला. यातील ५४९ मतदार वैध ठरले. या वैध मतांचे २ भाग करून एक जोडण्यात आला. त्यानुसार २७५ हा विजयाचा आकडा निश्चित झाला. भाजपचे चंद्रशेखर बावनकुळे यांना ३६२ मत मिळाली. विजयाच्या कोट्यापेक्षा त्यांना ८७ मते अधिकची मिळाली.
नोटाचा पर्याय नाही
लोकसभा, विधान परिषद व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत ‘नोटा’चा पर्याय देण्यात येते. परंतु, या निवडणुकीत मतदारांना नोटाचा पर्याय देण्यात आला नव्हता.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.