नागपूर : विधान परिषद निवडणुकीसाठी (Legislative Council elections) ४८ तास जिल्ह्यातील दारूची दुकाने बंद करण्यात येणार असल्याने मद्यप्रेमींची गैरसोय होणार आहे. बुधवारी सायंकाळी चार वाजतापासून जिल्ह्यात मद्यविक्री बंद (liquor shops closed) करण्याचे आदेश राज्य निवडणूक आयोगाने जिल्हाधिकाऱ्यांना दिले आहे. मतदानानंतर अर्थात १० डिसेंबरला सायंकाळी चारनंतर दारूची दुकाने उघडतील.
नागपूर जिल्ह्यात विधान परिषदेच्या निवडणुकीसाठी १० डिसेंबरला मतदान होणार आहे. जिल्ह्याची अतिसंवेदनशीलता लक्षात घेता कायदा व सुव्यवस्थेसाठी दारूची दुकाने बंद ठेवण्याबाबतचे आदेश राज्य निवडणूक आयोगाने जिल्हाधिकाऱ्यांना दिले. त्यामुळे जिल्हाधिकारी आर. विमला यांनी आज सायंकाळी उद्या चार वाजतापासून ते १० डिसेंबरला सायंकाळी चार वाजेपर्यंत दारू दुकाने बंद करण्याबाबत आदेश काढले. त्यामुळे दोन दिवस दारूची दुकाने बंद राहणार आहे. परिणामी मद्यपींची (Inconvenience to alcoholics) निराशा होणार आहे.
एकूणच विधान परिषद निवडणुकीच्या मतदानामुळे मद्यप्रेमींना दोन दिवसांचे मद्य आधीच घरी आणून ठेवावे लागणार आहे. लॉकडाऊन शिथिलतेच्या काळात मद्य घरपोच मिळत होते. परंतु, यावेळी तीही सोय नसल्याने मद्यप्रेमींना आधीच उपाययोजना करावी लागणार आहे.
१४ डिसेंबरलाही दारू नाही
विधान परिषद निवडणुकीसाठी मतमोजणी १४ डिसेंबरला होणार आहे. त्यामुळे या दिवशीही मतमोजणी संपेपर्यंत मद्यविक्रीची दुकाने बंद ठेवण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले आहे. आदेशाचे उल्लंघन केल्यास कारवाईचा इशाराही जिल्हाधिकाऱ्यांनी दिला आहे.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.