leopard Attack : खुंट्यावर बांधलेल्या गाईची बिबट्याकडून शिकार

leopard Attack : कन्हान परिसरातील निलज गावात बिबट्याने खुंट्याला बांधलेल्या गाईवर हल्ला करून तिची शिकार केली. या घटनेमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले असून वनविभागाने तातडीने उपाययोजना करण्याची मागणी होत आहे.
leopard attack
leopard attack sakal
Updated on

कन्हान : परिसरात वाघ व बिबटयाने धुमाकूळ घालून एकामागे एका दिवसाआड जनावरांवर हल्ला करुन त्यांची शिकार करीत असल्याने कन्हान परिसरातील नागरिकांत भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी त्वरित वाघ व बिबटयाचा बंदोबस्त करून नुकसानग्रस्त पशु मालकांना नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी जोर धरू लागली आहे. बुधवारी (ता.९)पहाटे कन्हानपासून ४ किमी अंतरावर निलज गावातील सालवा रोडलगत शेतातील कोठयात १८ ते २० दुधारू गाई बांधल्या होत्या.

यात धुऱ्यावर खुंट्याला बांधलेल्या कालवडीवर मागून बिबट्याने हल्ला करून तिला गंभीर जखमी केले. पशुमालक नरेश चकोले यांनी कन्हान वनविभागाचे बिट वनरक्षक एन.के. मेश्राम यांना माहिती दिली.

पारशिवनी वनपरिक्षेत्र अधिकारी ए.बी.भगत, धापडे, वनरक्षक वैशाली ठाकूर, रेखा तेडे, श्रीमती नान्हे, श्रीमती राऊत, वनमजूर फुलचंद, रूपचंद बिलोने, भलावी, लोढे, व्हिएसडिएफचे जवान व कन्हान पोलिस ठाण्याचे पोलिस उपनिरीक्षक एकनाथ राठोड स्टाफसह व वनमित्र शेखर बोरकर घटनास्थळी पोहचले.

संतप्त शेतकरी व नागरिकांना शांत करून गंभीर जखमी कालवडीवर उपचार करताना गाईचा मृत्यू झाला. घटनास्थळाचा पंचनामा करून पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांनी मृत गाईचे शवविच्छेदन केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.