वाडी (जि.नागपूर) : वाडी स्थित खडगाव मार्गावरील रस्ता व नालीच्या बांधकामात आलेली असमानता व व्यवसायिक नवनिर्मित नालीच्या उंचीने संकटात सापडले आहेत. या बाबीचे वृत्त दैनिक ‘सकाळ'मध्ये ‘नाल्या झाल्या वर अन् दुकाने खाली’ या मथळ्याखाली प्रकाशित होताच सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी, अभियंता यांच्यात खळबळ उडाली. त्यांच्या सहकाऱ्यांनी प्रत्यक्ष घटनास्थळी दाखल होऊन या कामाची माहिती घेतल्याचे व्यावसायिकांनी सांगितले.'आम्ही करून घेऊ'आपण जास्त लक्ष घालू नका, आता सिमेंट लावून झाकून देऊ, अशी उत्तरे देऊन वेळ मारून नेण्याचा प्रयत्न होताना दिसून आला.
अधिक वाचाः काय सुरू आहे वाडीत ? नाल्या झाल्या वर अन् दुकाने खाली !
पाणी कुठे मुरतेय?
अमरावती महामार्गाच्या वळणापासून या खडगाव मार्गाचे बांधकाम एकसारखे होणे अपेक्षित आहे. परंतू बऱ्याच ठिकाणी रस्ता रुंदीत व नालीत वेडेवाकडेपणा आल्याने असमानता आढळून येते. यासह रस्त्याच्या दोन्ही बाजूला फुटपाथची व्यवस्था कशी राहील, याबाबतही सांशकता निर्माण झाली आहे. यावरून या बांधकामाविषयी नागरिकात कमालीचे आश्चर्य व्यक्त केले जात आहे. मागील तीन महिन्यापासून वाडी स्थित खडगाव मार्गाचे सार्वजनिक बांधकाम विभागाच्या वतीने निर्माणकार्य सुरू आहे. परंतू या रस्ता बांधकामाच्या रुंदीचे टेंडर २४ मी.निश्चित झाले असताना बऱ्याच ठिकाणी हा रस्ता १५ मी.पर्यंत अरुंद कसा झाला, याबाबत नागरिकात आश्चर्य व्यक्त होत आहे. वरच्या पातळीवर कुठे तरी पाणी मुरत असल्याची चर्चा नागरिकांत दिसून आली.
नाली बांधकामाच्या सळाखी बाहेर, सिमेंट आत
प्रस्तूत प्रतिनिधीने प्रत्यक्ष नाली बांधकामाची पाहणी केली असता प्रा.रमेश रामटेककर यांच्या घराजवळ कालच बांधकाम झालेल्या या बांधकामाच्या सळाखी वर आलेल्या दिसत आहेत. रामटेककर यांनी याबाबत बांधकाम अभियंता यांच्यासोबत चर्चेत ‘सेंट्रींग’ व्यवस्थित लागली नसल्याचे कळविले होते. परंतू त्यांनी 'आम्ही करून घेऊ'आपण जास्त लक्ष घालू नका,असे सांगून आश्वस्त केले होते. परंतू आता प्रत्यक्ष कॉंक्रिटिंग झाल्यानंतर सळाखी बाहेर आलेल्या दिसत आहेत. अभियंता आता सिमेंट लावून झाकून देऊ, अशी बतावणी करत असल्याचे त्यांनी सांगितले. यावरून दर्जाहिन व निकृष्ट कामाला सारवासारव होत असल्याचे लक्षात येते.
आहे ते भरपूर आहे!
वाडीत पी.डब्ल्यू.डी.ची जागा कमी आहे. टेकडी वाडी, लाव्हा, खडगाव हे जुने गावठाण असल्याने नकाशावर २४ मी.ऐवजी जेवढी जमीन रस्ता बांधकामासाठी उपलब्ध झाली, तेवढी घेण्यात आली. यामुळे नाली कुठे कमी व कुठे जास्त करावी लागली. नागरिकांना आतापर्यंत काहीच उपलब्ध नव्हते जे होत आहे ते भरपूर आहे.
श्री.कुचेवार
मुख्य अभियंता, सार्वजनिक बांधकाम विभाग
संपादनः विजयकुमार राऊत
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.