Wardha Crime : आरोपीला मरेपर्यंत जन्मठेप...लग्नाचे आमिष देत अल्पवयीन मुलीचे लैंगिक शोषण वर्धा

Wardha Crime : वर्धा येथे अल्पवयीन मुलीचे लग्नाचे आमिष देऊन लैंगिक शोषण करणाऱ्या आरोपीला मरेपर्यंत जन्मठेपेची शिक्षा ठोठावली. न्यायालयाने आरोपी अन्सार अनामत हुसेन याला दोषी ठरवून कठोर शिक्षा सुनावली.
Wardha Crime
Wardha Crime sakal
Updated on

वर्धा : अल्पवयीन मुलीला लग्नाचे आमिष देत तिच्यावर वारंवार बलात्कार करून तिचे शोषण करणाऱ्या नराधमास मरेपर्यंत जन्मठेपेची शिक्षा ठोठावण्यात आली. अन्सार अनामत हुसेन (वय २४) असे आरोपीचे नाव असल्याचे सांगण्यात आले आहे.

हा निकाल अति. सत्र न्यायाधीश व्हि. पी. आदोने यांनी दिला. तसेच पीडितेला नुकसान भरपाई म्हणून दंडाच्या रकमेतून पाच हजार रुपये देण्याचे आदेश देण्यात आले.घटनेची थोडक्यात हकिगत अशी की, यातील पीडिता ही तिच्या वर्ग मित्राच्या घरी गणपती निमित्त जेवणाच्या कार्यक्रमा करिता गेली तिथे तिची ओळख अन्सार अनामत हुसेन याच्याशी झाली. ओळखीचे रूपांतर प्रेमात झाले.

त्याने तिला लग्नाचे आमिष देत तिच्याशी वारंवार बळजबरी केली. अशातच आरोपीने पीडितेच्या घरी येत लग्न करण्याचे म्हणत चांगलाच गोंधळ घातला. यावरून पीडितेच्या आईवडिलांनी पोलिसात तक्रार दाखल केली. महिला पोलिस उप निरीक्षक अनुराधा फुकट यांनी केला. नंतरचा तपास पोलिस तिरीक्षक सत्यवीर बंडीवार यांनी केला.

तपासा दरम्यान आरोपीने गुन्हा केल्याचा सबळ पुरावा उपलब्ध झाल्यामुळे दोषारोपपत्र न्यायालयात दाखल केले. सरकार तर्फे सहाय्यक सरकारी अभियोक्ता विनय आर. चुडे यांसी कामकाज पाहिले. त्यांना सदर प्रकरणात अॅड. स्वाती एन. गेडे (दोडके) यांनी मदत केली. सदर प्रकरणात पोलिस कर्मचारी देवेंद्र कडू, यांनी साक्षदाराता हजर करून मोलाची कामगिरी बजावली. शासना तर्फे एकूण ११ साक्षदार तपासले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.