चिमुकल्यांची आर्तहाक... ‘बाबाऽऽ प्लीज, तुम्ही जेथे असाल तेथून घरी परत या...'

The little ones relied on social media to find their father
The little ones relied on social media to find their father
Updated on

मेंढला (ता. नरखेड, जि. नागपूर) : कोरोना व लॉकडाउनमुळे अनेकांचे हाल झाले आणि होत आहे. कुणाला आपल्या नातेवाईकांच्या लग्नाला जाता आले नाही तर अनेकांना अंत्यसंस्काराला... कुणाला दोनवेळच्या जेवणासाठी रांगेत लागावे लागले तर कुणाला दुसऱ्यांसमोर हात पसरवला लागले. अनेकांचा तर आपल्या घरी परत जाण्यांच्या चक्करमध्ये मृत्यू झाला. अनेक चिमुकल्यांची आपल्या पालकांशी अनेक महिण्यांपासून भेट झालेली नाही. असाच एक प्रकार नागपूर जिल्ह्यातील नरखेड तालुक्यातील मेंढला येथे पाहायला मिळाला, वाचा सविस्तर...

प्राप्त माहितीनुसार, नरखेड तालुक्यातील रणजित नामदेवराव घोरपडे (मु. पो. खरबडी, ता. नरखेड, जि. नागपूर) हे पत्नी व चिमुकल्या मुला-मुलींसह गुण्या गोविंदाने नांदत होते. मात्र, ते अचानक ४ डिसेंबर २०१९ रोजी घरून कुणाला काहीही न सांगता निघून गेले. कुटुंबीयांनी सर्वत्र शोध घेतला असता ते कुठेच आढळून आले नाही.

आज येईल उद्या घरी येईल याच विचाराने कुटुंबीय त्यांची वाट पाहत होते. रात्ररात्रभर कुटुंबीय घराच्या मुख्य दाराकडे टक लावून पाहत असायचे. मात्र, रणजित काही घरी आले नाही. हतबल झालेल्या कुटुंबीयांनी शेवटी ८ फेब्रुवारी २०२० रोजी जलालखेडा पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. तक्रार दाखल केल्यानंतर पोलिस त्यांचा शोध घेत होते. मात्र, अद्याप त्यांचा शोध लागलेला नाही.

अशात २२ मार्चनंतर देशात लॉकडाऊन सुरू झाले. कुणालाही घराबाहेर निघण्यात मनाई करण्यात आली. अत्यावश्यक सेवा वगळता इतरांना बाहेर निघण्यात मनाई असल्याने गरिबांचे चांगले हाल झाले. या भयानक काळात पत्नीच घरी नसल्याने पत्नीसह चिमुकल्यांवर उपासमारीची वेळ आली आहे. नको ते दिवस चिमुकल्यांसमोर येऊन ठाकल्याने ‘बाबाऽऽ प्लीज, तुम्ही जेथे असाल तेथून घरी परत या...' अशी आर्तहाक चिमुकले करीत आहे.

सोशल मीडियाचा वापर

जवळजवळ नऊ महिण्यांपासून बाबा घरी न आल्याने चिमुकले रडकुंडीस आले आहेत. तसेच घरचा कर्ता पुरुष घरी नसल्याने पत्नी ऐकटी पडली आहे. तिच्या व मुलांच्या रात्रीही घराच्या मुख्य दाराकडे नजरा लागून असतात. ते परत आले असावे याच विचारातून त्या वाट पाहत आहेत. त्यांची ही व्यथा पाहून अनेकांनी मदतीसाठी धाव घेतली आहे. सोशल मीडियाच्या माध्यमातून त्यांचा शोध घेण्याचा प्रयत्न सुरू आहे.

आमची बाबांसोबत भेट घालवून द्या

नऊ महिण्यांपासून बाबा घरी न आल्याने ‘आमची बाबांसोबत भेट घालवून द्या' असे भावनात्मक आवाहन चिमुकल्या मुला-मुलीकडून करण्यात येत आहे. पिवळे शर्ट आणि काळा पॅंट परिधान करून घरून कोणालाही न सांगता निघून गेलेले रणजित नामदेवराव घोरपडे यांचा शोध घेण्याचा आवाहन करण्यात येत आहे. असा इसम कोणालाही आढळून आल्यास त्यांनी जलालखेडा पोलिस ठाण्यात ८६९८६३३७११ व ७७0९६६२१३७ या क्रमांकावर संपर्क साधण्यचे आवाहन करीत आहे.

पोलिसाच्या मुलीवरही आली होती मदत मागण्याची वेळ

‘बेटा मला येथून काढ, नाही तर मी मरून जाईन, मला जगायचे आहे तुमच्यासाठी' ही बापाने आपल्या मुलीला केलेली आर्त विनवणी... अगदीच कोणाचेही जीव हेलावून टाकणारी आहे... परंतु, निर्दयी प्रशासनाला आणि निगरगट्ट अधिकाऱ्यांना त्याचे काय? बापाला वाचविण्याच्या प्रयत्नात कार्डियाक रुग्णवाहिकेसाठी मुलीने अख्खी रात्र मनपा आयुक्तांसह अन्य अधिकाऱ्यांना फोन आणि मॅसेज करून रुग्णवाहिका उपलब्ध करून देण्याची मागणी केली. मात्र, त्यांनी तिला कोणताही प्रतिसाद दिला नाही. अखेर तिच्या धडधाकट बापाचा कोविड-१९ने मृत्यू झाला. मन हेलावून टाकणारी ही कहाणी होती मुख्यालयात नेमणुकीवर असलेल्या सहायक उपनिरीक्षक भगवान शेजूळ (वय ५४) यांची.

संपादन - नीलेश डाखोरे

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()