Quit Addiction : आधी स्वतः सोडले व्यसन नंतर इतरांच्या व्यसनमुक्तीचा ध्यास !

प्रसाद कामटकर यांचा थक्क करणारा प्रवास; नशेमुळे गमावली होती नाेकरी
Quit Addiction
Quit Addictionsakal
Updated on

नागपूर : एकदा व्यसन लागले की अथक प्रयत्न करूनही ते सहसा सुटत नाही. व्यसनाधीनतेमुळे आतापर्यंत अनेकांचे संसार उद्ध्वस्त झाल्याचे आपण पाहिले आहे. यवतमाळ येथील प्रसाद कामतकर हेही अशाच अनुभवातून गेले आहे. व्यसनाधीनतेमुळे त्यांचेही अख्खे आयुष्य उद्ध्वस्त होऊन नोकरी गमवावी लागली.

मात्र मनाशी ठाम निश्चय करून त्यांनी केवळ व्यसनच सोडले नाही तर, स्वतः व्यसनमुक्ती केंद्र सुरू करून तिनशेच्यावर नागरिकांनाही व्यसनमुक्त केले आहे. सुसंस्कारी घरात जन्मलेले उच्चशिक्षित प्रसाद यांनी लहानपणी डॉक्टर किंवा इंजिनियर बनण्याचे स्वप्न पाहिले होते.

मात्र बी. एस्सी. ची पदवी घेताच त्यांना प्राचार्य असलेल्या वडिलांच्याच महाविद्यालयात नोकरी लागली. नोकरी करीत असतानाच अचानक त्यांना मित्रांच्या संगतीत दारूचे व्यसन लागले. उत्सुकतेपोटी सुरू केलेल्या दारूने कधी आयुष्यात कायमचे घर केले, हे त्यांना कळले नाही.

Quit Addiction
Chandrayaan 3 Mission : खामगावचं थर्मल शिल्ड थेट चांद्रयानावर, भारताच्या स्वप्नपूर्तीत विदर्भाचा खारीचा वाटा

दिवसेंदिवस दारूचे प्रमाण वाढत गेले. ते दररोज दारू पिऊन घरी यायचे. परिणामतः त्यांना अवघ्या तिशीत नोकरीही गमवावी लागली. शिवाय कुटूंबात व समाजातही तुच्छ वागणूक मिळायला लागली.

आई-वडिलांसह पत्नी आणि दोन मुलेही त्यांच्यामुळे त्रासून गेली होती. अखेरचा पर्याय म्हणून कुटुंबियांनी त्यांना हिंगणा (नागपूर) येथील मैत्री व्यसनमुक्ती केंद्रात आणले. तीन महिन्यांच्या समुपदेशनानंतर त्यांचे व्यसन कायमचे सुटले.

दारूमुळे इतरांचे जीवन उद्ध्वस्त होऊ नये, या उद्देशाने त्यांनी नंतर यवतमाळमध्येच ''परिवर्तन'' नावाचे व्यसनमुक्ती केंद्र सुरू केले. या माध्यमातून त्यांनी आतापर्यंत जवळपास तिनशेच्यावर तरुण व समवयस्कांची दारू कायमची सोडविली आहे.

Quit Addiction
Nagpur News : मनपा निवडणूक आता लोकसभेनंतरच?

आजच्या घडीला त्यांच्या मार्गदर्शनाखाली या केंद्रामध्ये २० ते २५ व्यसनाधीन व्यक्ती नियमित उपचार घेत असून, लवकरच तेही व्यसनमुक्त होईल, अशी त्यांना आशा आहे. माझ्या प्रयत्नांमुळे कुणाचे व्यसन सुटून, ते मुख्य प्रवाहात येत असतील, तर याचा निश्चितच आनंद व अभिमान वाटतो, असे त्यांनी यावेळी सांगितले. ४५ वर्षीय प्रसाद यांचा हा अद्‍भूत प्रवास व्यसनाच्या आहारी गेलेल्या शेकडो तरुणांसाठी प्रेरणादायी म्हणावा लागेल.

कोणतेही व्यसन हे शारीरिक व मानसिक आजार आहे. ते कायमचे सोडण्यासाठी मनाशी पक्का निर्धार करणे खूप आवश्यक असते. तुम्हाला पश्चात्ताप आणि चुक मान्य असेल तरच तुमचे व्यसन सुटू शकते, अन्यथा नाही. खरं तर तरुणांनी व्यसनाच्या आहारी जाऊच नये, असाच माझा सर्वांना सल्ला आहे.

-प्रसाद कामटकर, संचालक, परिवर्तन व्यसनमुक्ती केंद्र

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()